मराठी
featured image DM

प्रस्तावना – दैवी दयेचे 365 दिवस सुरू होत आहेत!

आज आपण ज्या जगात राहतो, तिथे हिंसा, अराजक, निराशा आणि मनातला एकाकीपणा वाढत चालला आहे. रोजच्या ठळक बातम्या आणि समाजमाध्यमे यांसारख्या आधुनिक संवादमाध्यमांमुळे या जगात अनेक जण एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे…

चिंतन 365: दयेची राणी

हे शेवटचे चिंतन दयेची राणी, परम गौरवशाली देवमाता, हिला अर्पण केले आहे. देवाची दया जगापर्यंत पोहोचवण्याचे ती इतर सर्वांपेक्षा अधिक परिपूर्ण साधन होती आणि आजही आहे. देवदूताने तिला शुभसंदेश दिला तेव्हा तिने दिलेल्या संमतीने, म्हणजेच तिच्या “होकाराने”, तिने स्वतः दयास्वरूप प्रभूला या जगात जन्म दिला. ती…

चिंतन 364: मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी प्रार्थना

तुमच्या शाश्वत तारणाच्या दृष्टीने तुमच्या मृत्यूची घटका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘नमो मारिये’ ही प्रार्थना म्हणताना तुम्ही विशेषतः या पवित्र घटकेसाठी प्रार्थना करता. ही एक पवित्र घटका आहे. पण याच घटकेला दुष्ट आत्मा तुमच्यावर पुन्हा एकदा झडप घालून हिरावून घेण्याचा प्रयत्न करील…

चिंतन 363: देवाची वाणी ऐकणे

कल्पना करा की तुम्ही एका गजबजलेल्या खोलीत आहात. तिथे खूप गोंगाट आहे आणि खोलीच्या दुसऱ्या टोकाहून कुणीतरी तुमच्याशी कुजबुजून बोलत आहे. ती व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे तुमच्या लक्षात येईल; पण तिचे बोलणे ऐकू येणे कठीण जाईल. देवाच्या वाणीचेही असेच आहे. देव बोलतो तेव्हा तो कुजबुजतो. तो अगदी हळुवारपणे बोलतो…

चिंतन 362: दयेने भरलेली दोन हृदये

येशूचे हृदय म्हणजे निखळ दया.  तो जगावर अखंड झरणारा कृपेचा झरा आहे.  ही दिलासा देणारी गोष्ट आहे, पण आणखी एका हृदयानेही दयेचा झरा बनले पाहिजे—ते म्हणजे तुमचे हृदय.  तुम्ही प्रभूच्या दयेत इतके बुडून गेले पाहिजे की तुमचे हृदय…

चिंतन 361: त्याग आणि प्रार्थना

हे समजून घेणे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण वाटले, तरी शुद्ध प्रार्थनेशी जोडलेला अंतःकरणातील त्याग जगभर सुवार्तेच्या घोषणेसाठी अतिशय फलदायी ठरतो. खरे तर, दररोज अंतःकरणातून अर्पण करणाऱ्या पवित्र आत्म्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे पाठबळ धर्मप्रसारकांना लाभले नसते तर…

चिंतन 360: आध्यात्मिक लढा

मोहात पाडणारा सैतान खरोखर आहे, पण त्याला घाबरण्याचे कारण नाही. त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तो सुचवतो त्या विचारांना थारा देऊ नका. त्याच्याशी सौदेबाजी करू नका. मोहांना सामोरे जाताना धैर्य धरा, देवाच्या दयेवर विश्वास ठेवा आणि आशा बाळगा. होऊ नका…

चिंतन 359: शाश्वत प्रेम

देवाच्या ठायी काळ नाही. काळ ही केवळ या धरणीवरील वास्तवाला लागू होणारी गोष्ट आहे. देवामध्ये सर्व काही आहे, सदैव होते आणि सदैव राहील. या शाश्वत प्रेमाचा एक परिणाम असा की देव तुमच्यावर अनादिकाळापासून प्रेम करत आला आहे. जगाची निर्मिती होण्यापूर्वीपासूनच तो तुम्हाला ओळखतो आणि यापुढेही ओळखत राहील…

चिंतन 358: देवाची दुहेरी देणगी

देवाच्या दयेविषयी बोलताना आपण अनेकदा पापांच्या क्षमेविषयी बोलतो. ही देवाच्या दयेची पहिली कृती आहे. प्रत्येक पाप, अगदी किरकोळ उणीवही, त्याच्या नजरेतून सुटत नाही. या पापांमुळे आपल्या प्रभूला क्लेश होतात, तरीही तो आपल्यावर विपुल दया करतो आणि आपल्याला क्षमा करतो. क्षमा…

चिंतन 357: कृपेच्या प्रेरणा

एखादी व्यक्ती व्याकुळ असते तेव्हा तुम्ही कदाचित तिच्याशी बोलणे टाळता. तिच्याशी बोलण्यात आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल, असे सहज वाटू शकते. पण तुमच्या संवादाला प्रभू दिशा देत असेल, तर तो थोड्याच वेळात अद्भुत गोष्टी घडवू शकतो. अर्थात, असेही काही प्रसंग असतात…