मराठी

चिंतन 279: तुमच्या अंतःकरणातील खात्री

तुमच्या आत्म्यात उमटणाऱ्या अंतरीच्या खात्रीतून देव तुमच्याशी काय बोलतो, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. कधी देवाचा आवाज ठळक आणि स्पष्ट वाटेल, तर कधी तो क्षीण आणि संभ्रमात टाकणारा वाटेल. अनेक गोष्टींमुळे देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ शकते…

चिंतन 278: देवाच्या दयेची रहस्ये उलगडणाऱ्या खिडक्या

येशूच्या हृदयातून दयेचे किरण झळकत आहेत, अशी त्याची प्रतिमा चित्रकाराकडून रंगवून घेण्यास संत फॉस्टिनाला सांगण्यात आले. तिने तसे केले आणि या प्रतिमेद्वारे अनेक आत्मे आपल्याकडे आकर्षित होतील, असे येशूने तिला आश्वासन दिले. येशू आणि संत फॉस्टिना यांनी या प्रतिमेला दिलेल्या महत्त्वाचा विचार करणे उद्बोधक आहे…

चिंतन 277: तणाव दूर करणारी दया

ताणतणाव हा अनेकदा जीवनाचा एक भाग असतो.  काही जणांना दैनंदिन जीवनात खूप ताण, वैफल्य आणि अगदी तीव्र रागालाही सामोरे जावे लागते.  दुसऱ्याचा राग पाहून तुम्ही सुरुवातीला सावध होऊ शकता आणि भीतीला बळी पडण्याचा मोह होऊ शकतो.  ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.  दुसऱ्याचा राग तुम्हालाही प्रतिक्रिया द्यायला भाग पाडू शकतो…

चिंतन 276: कार्य दिसते, पण पूर्ण करता येत नाही

देवाच्या गौरवासाठी एखादे कार्य तुम्ही पूर्ण केले नाही, तर देव तुमच्यावर रागावतो का? ते अपयशाच्या कारणावर अवलंबून आहे. तुमच्या पापामुळे ते कार्य पूर्ण झाले नसेल, तर देव आपला पवित्र रोष प्रकट करू शकतो. हा रोष म्हणजे त्याच्या दयेची कृती आहे; त्याद्वारे तो तुम्हाला पश्चात्ताप करून त्याच्याकडे वळण्यास बोलावतो. पण काही वेळा तुमच्या कामात आणि देवाच्या सेवेत अडथळे येऊ शकतात…

चिंतन 275: नीरस दिवसांचे वैभव

पहिल्यांदा विचार केला तर, विरोध दाखवण्यासाठी वापरले असतील तरच ‘नीरसपणा’ आणि ‘वैभव’ हे शब्द एकत्र येऊ शकतील, असे वाटेल. पण देवाच्या मनात या दोन शब्दांचे जणू लग्नच लागले आहे. ते या अर्थाने ‘एकमेकांशी जोडलेले’ आहेत की आपल्या रोजच्या नीरस कर्तव्यांतूनही आपण देवाचा गौरव करू शकतो आणि पावित्र्य प्राप्त करू शकतो. हे जरी…

चिंतन 274: आपल्या व्रतांचे नूतनीकरण

विवाहित दांपत्यांनी वेळोवेळी, विशेषतः लग्नाच्या महत्त्वाच्या वर्धापनदिनांना, आपल्या विवाहवचनांचे नूतनीकरण करण्याची प्रथा आहे. धर्मगुरू आणि समर्पित धार्मिक जीवन जगणारे स्त्री-पुरुषही आपल्या व्रतांचे व वचनांचे नूतनीकरण करतात. ही प्रथा चांगली आणि पवित्र आहे, कारण आपण सतत नूतनीकरण केले पाहिजे…

चिंतन 273: लौकिक बंध नकोत, केवळ देवावर प्रेम

देवाशी असलेले आपले नाते जेव्हा सर्वोच्च टप्प्यावर पोहोचते, तेव्हा इतर सर्व लौकिक बंध गळून पडतात. त्यामुळे उत्कटतेने आणि दृढ निश्चयाने देवाकडे धाव घेताना आपल्याला कशाचाही अडथळा राहत नाही. या जीवनातील प्रत्येक आसक्तीतून आपण मुक्त झाले पाहिजे, जेणेकरून आपली निष्ठा केवळ देवाशी आणि त्याच्या पवित्र…

चिंतन 272: हृदयातील भाव बाह्य जीवनात कसे प्रकट होतात

तुमचे हृदय तुम्हाला आणि देवालाच दिसते; इतर कोणालाही ते दिसत नाही. तुमच्या अंतर्जीवनातील प्रत्येक तपशील देवाला पूर्णपणे माहीत आहे; पण तुम्हाला ते तपशील पूर्णपणे कळत नाहीत. तरीही, तुमच्या अंतर्जीवनाच्या वास्तवाची जाणीव अधिकाधिक होत जाणे महत्त्वाचे आहे. पाहा…

चिंतन 271: जीवनातील अडथळ्यांपलीकडे पाहणे

आपली दुःखे, झालेले अपमान आणि इतरांची चुकीची मते यांत मन अडकून राहणे ही एक सामान्य प्रवृत्ती आहे. बहुतेकांना या मोहाशी झुंज द्यावी लागते. यांपैकी एखादे ओझे किंवा अनेक ओझी आपल्याला वाहावी लागतात, तेव्हा त्यांनाच आपल्या जीवनाचे केंद्र बनवण्याचा मोह होऊ शकतो. उदाहरणार्थ…

चिंतन 270: देवाच्या इच्छेतील बारकावे

तुम्ही आपल्या जीवनात देवाची इच्छा स्वीकारायला तयार आहात का? तसे असेल, तर तिच्यातील प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष देण्याची तुमची तयारी हवी. देवाची इच्छा ही काही भव्य पण मोघम कल्पना नाही. ‘मी प्रभूच्या मार्गाने चालेन’ असे सर्वसाधारणपणे म्हणणे म्हणजे त्याची इच्छा निवडणे नव्हे. उलट, त्याची इच्छा निवडणे म्हणजे…