मराठी

चिंतन 47: इतरांच्या गरजा ओळखणे

अनेकदा आपण स्वतःमध्ये आणि स्वतःच्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपल्या सभोवतालच्या लोकांच्या, विशेषतः आपल्या कुटुंबीयांच्या, अडचणी आणि गरजा आपल्या लक्षात येत नाहीत.  कधीकधी…

चिंतन 43: संकटात संयम

देवाच्या दृष्टीने कशाला अधिक मोल आहे? तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवण्याला, की जीवनातील प्रत्येक संकट संयमाने आणि मनःशांतीने सहन करण्याला? अनेकांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण वाटेल आणि दोन्ही पर्याय निवडावेसे वाटतील. आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि…

चिंतन 29: सांत्वनाचे क्षण

आपण दररोज मनापासून देवाचा शोध घेत असलो, तर अगदी योग्य वेळी आपल्याला सांत्वनाचा एखादा क्षण लाभतो. कधी अनपेक्षितपणे शांती किंवा आनंद मिळतो, कधी नवी समज आणि धीर मिळतो, तर कधी आपल्याला केवळ देवाची उपस्थिती जाणवते, आपल्या…

चिंतन 361: त्याग आणि प्रार्थना

हे समजून घेणे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण वाटले, तरी शुद्ध प्रार्थनेशी जोडलेला अंतःकरणातील त्याग जगभर सुवार्तेच्या घोषणेसाठी अतिशय फलदायी ठरतो. खरे तर, दररोज अंतःकरणातून अर्पण करणाऱ्या पवित्र आत्म्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे पाठबळ धर्मप्रसारकांना लाभले नसते तर…

चिंतन 355: निरर्थक बोलणे, आत्म्याच्या आळशीपणाचे लक्षण

काही जण इतरांबद्दल बोलण्यात फार पटाईत असतात. जणू काही त्यांना सगळेच कळते, अशा थाटात ते इतरांबद्दल मोकळेपणाने बोलतात, सतत मते मांडतात आणि त्यांना दोष देतात. तुम्ही अशा लोकांसारखे होऊ नका. इतरांच्या कृतींमध्येच ज्यांचे मन आणि जीभ गुंतलेली असतात…

चिंतन 339: निर्मळ आत्मा

हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण ज्या आत्म्याचे देवावर निर्मळ प्रेम असते, त्याची अनेकांना भीती वाटते. त्यांना वाटणारी ‘भीती’ म्हणजे अशा आत्म्याला विरोध करण्याची भीती. दुष्ट हेतू असलेले लोक अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाहीत, कारण तो हल्ला त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांना माहीत असते. हे अशक्य आहे…

चिंतन 331: तुमच्या शक्तीपलीकडे काहीही नाही

तुमच्या शक्तीपलीकडचा क्रूस वाहण्याची वेळ प्रभू तुमच्यावर कधीही येऊ देणार नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.  यावर तुमचा विश्वास आहे का?  असेल, तर तो विश्वास तुम्हाला पुढच्या वाटेवर नजर ठेवून देवाची इच्छा पूर्ण करत धैर्याने पुढे जाण्यास मदत करील.  तुमच्या वाटेत अडचणी आल्या, अगदी…