मराठी

चिंतन 326: प्रभूची वाट पाहणे

अधीरतेशी झुंज देण्याचा अनुभव अनेकांना येतो. आपल्याला जे हवे असते, ते हवे त्याच क्षणी मिळावे असे आपल्याला वाटते. वेगाने धावणाऱ्या आपल्या समाजात प्रत्येक गोष्ट लगेच मिळण्याची आपल्याला सवय झाली आहे. काही मिनिटांत संपूर्ण जेवण पुन्हा गरम करता येते, काही सेकंदांत जगभर मजकूर संदेश पाठवता येतात, बातम्या पसरतात…

चिंतन 277: तणाव दूर करणारी दया

ताणतणाव हा अनेकदा जीवनाचा एक भाग असतो.  काही जणांना दैनंदिन जीवनात खूप ताण, वैफल्य आणि अगदी तीव्र रागालाही सामोरे जावे लागते.  दुसऱ्याचा राग पाहून तुम्ही सुरुवातीला सावध होऊ शकता आणि भीतीला बळी पडण्याचा मोह होऊ शकतो.  ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.  दुसऱ्याचा राग तुम्हालाही प्रतिक्रिया द्यायला भाग पाडू शकतो…

चिंतन 227: मानवी योजना विफल होतात

आपल्या जीवनासाठी आणि देवाच्या गौरवासाठी एखादी उत्तम योजना आपण आखली आहे, असे आपल्याला सहज वाटू शकते. आपण विचार करतो, योजना आखतो आणि त्यानुसार सर्व गोष्टी ठरावीक पद्धतीने उभ्या करतो व त्यांची जुळवाजुळव करतो; पण शेवटी आपल्या मनात जे होते, ते देवाच्या मनात नव्हते, असे आपल्याला उमगते…

चिंतन 174: देवाची वेळ नेहमीच योग्य असते

या जगात देवाची इच्छा पूर्ण करावी आणि त्याच्यासाठी अद्भुत कार्ये करावीत, अशी आपली इच्छा असते. तरीही कधीकधी आपण आपल्या पद्धतीने आणि आपल्याला योग्य वाटेल त्या वेळी ती कार्ये करण्याचा प्रयत्न करतो. पण देवाची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण करायची असेल, तर तुम्ही कळकळीने प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या पवित्र इच्छेला स्वतःला समर्पित केले पाहिजे आणि मग तिची पूर्तताही त्याच्यावर सोपवली पाहिजे…

चिंतन 172: संयमाने केलेले समर्पण

तुम्ही संयमी आहात का? संयम आणि अधीरता हे दोन्ही तुमच्या इच्छाशक्तीतील संघर्षातून जन्माला येतात. जीवनात अनेकदा तुमची इच्छा देवाऐवजी दुसऱ्याच एखाद्या गोष्टीकडे ओढली जाते. देव तुम्हाला त्या दिशेने नेत नसतानाही ती गोष्ट तुम्हाला हवीशी वाटते. संयम हा असा सद्गुण आहे, जो तुम्हाला क्षणभर थांबून, एक दीर्घ…

चिंतन 139: ईश्वरी परिपालनानेच हे घडते

कधीकधी देवाने ठरवलेल्या वेळेआधीच त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण घाई करतो. परिणामी, देवाची इच्छा पूर्ण करण्याऐवजी आपण स्वतःचीच इच्छा पूर्ण करतो. धीर धरणे हीच गुरुकिल्ली आहे. प्रभूने आपल्यामध्ये कार्य करावे म्हणून आपण धीराने त्याची वाट पाहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याद्वारे सर्व काही करणारा तोच असेल. खरे तर…

चिंतन 66: दयेद्वारे न्याय

काही जणांना दिवसेंदिवस दुसऱ्या व्यक्तीच्या कठोर आणि क्रूर वागणुकीला सामोरे जावे लागते. हे फार वेदनादायक असते. त्यामुळे, दुःख देणाऱ्या व्यक्तीला तिच्या कृत्यांचा जाब विचारला जावा आणि न्याय मिळावा, अशी तीव्र इच्छा होऊ शकते. पण खरा प्रश्न असा आहे: प्रभू मला काय करायला बोलावत आहे? मी कसा प्रतिसाद देऊ…

चिंतन 53: प्रार्थनेतील अडचणी

रोज प्रार्थना करण्याची सवय लावताना आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी येतात.  अंतर्गत अडचणी: निरुत्साह, प्रार्थनेत जाणवणारा कोरडेपणा, मनाचा जडपणा आणि मोह.  संयमाने आणि चिकाटीने या अडचणींवर मात करता येते.  बाह्य अडचणी…

चिंतन 43: संकटात संयम

देवाच्या दृष्टीने कशाला अधिक मोल आहे? तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवण्याला, की जीवनातील प्रत्येक संकट संयमाने आणि मनःशांतीने सहन करण्याला? अनेकांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण वाटेल आणि दोन्ही पर्याय निवडावेसे वाटतील. आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि…