दर्शनपात्रातील परमपवित्र संस्कारात उपस्थित येशू, needpix.com वरून
परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तावर आपण कितीही गाढ प्रेम केले आणि कितीही भक्तिभावाने त्याची आराधना केली, तरी ते पुरेसे ठरणार नाही. परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तासमोर आपण असतो, तेव्हा त्या रूपाआड खरोखर उपस्थित असलेला सर्वशक्तिमान देव आपल्याला दिसला पाहिजे. तोच दया, शाश्वत जीवन, सनातन देव, पाप्यांचा तारणारा, जीवनदायी पाणी, निर्मळ प्रेमाची अग्नी, आपल्या सर्व व्याधींवरील औषध, प्रेमाच्या सर्व भावनांचे मूर्त रूप, सर्वांची आशा आणि आपली ओझी उचलणारा आहे… आणि तो आपल्या पूर्ण विश्वासास पात्र आहे (पाहा दैनंदिनी #356).
पवित्र ख्रिस्तप्रसादाकडे निरखून पाहताना तुम्हाला काय दिसते? तुमच्या डोळ्यांना भाकर दिसते, पण आत्म्याच्या दृष्टीने तुम्हाला देव दिसला पाहिजे. देव त्याच्या संपूर्ण वैभवात आणि सामर्थ्यात तुम्हाला दिसावा आणि तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी त्याची आराधना करावी. पवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या आपल्या प्रभूशी तुमचे नाते कसे आहे, याचा विचार करा. देवाने तुमचे मन त्याच्या खऱ्या ओळखीने भरून टाकावे आणि तुमच्या हृदयात त्याच्याविषयी उत्कट प्रेम जागवावे, अशी प्रार्थना करा.
हे प्रभू, परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या तुला ओळखण्यास आणि तुझ्यावर प्रेम करण्यास मला मदत कर. या पवित्र देणगीतून तुझ्या दयेची जी भेट आम्हाला लाभते, ती समजून घेण्यास मला मदत कर. या पवित्र ख्रिस्तप्रसादात उपस्थित असलेल्या तुझ्यासमोर मी जेव्हा जेव्हा येईन, तेव्हा तेव्हा तुझी आराधना करायला मला शिकू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
एकतिसावा दिवस चिंतन:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस
25 मार्च – प्रभूच्या जन्माची शुभवार्ता
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




