प्रतिमा सौजन्य: pxfuel.com
व्हिडिओ
तुम्हाला नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे वागता आले, तर किती छान होईल, नाही का? प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक परिस्थितीत देवाला मनापासून, काहीही राखून न ठेवता, “हो” म्हणायचे तुम्ही ठरवू शकलात तर? खरे तर, तुम्हाला हे शक्य आहे. असा पूर्ण होकार देण्याच्या आड येतो तो फक्त तुमच्या स्वतःच्या इच्छेचा हट्टी आग्रह (पाहा दैनंदिनी #374).
आपण हट्टी आहोत आणि आपल्याला स्वतःच्याच मनाप्रमाणे वागायचे असते, हे मान्य करणे कठीण आहे. स्वतःच्या इच्छेचा आग्रह सोडून प्रत्येक गोष्टीत देवाच्या इच्छेप्रमाणे वागणेही कठीण आहे. पण ते कितीही कठीण असले, तरी आपण तसा दृढ निश्चय केला पाहिजे. आणि जेव्हा आपण कमी पडतो, तेव्हा तो निश्चय पुन्हा केला पाहिजे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला कधीही कंटाळू नका. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आपल्या प्रभूच्या हृदयाला आनंद होतो.
हे प्रभू, प्रत्येक गोष्टीत तुझ्या दैवी इच्छेचा स्वीकार करावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या स्वार्थी इच्छेच्या आग्रहातून मुक्त होण्यास आणि प्रत्येक गोष्टीत तुलाच निवडण्यास मला मदत कर. मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. जेव्हा मी पडतो, तेव्हा निराशेला बळी न पडता पुन्हा उठण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
चौतीसावा दिवस — ध्यानचिंतन:
वाळवंटातील ४० दिवस & क्रुसापाशी ४० दिवस
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




