मराठी

चिंतन 104: दयेची जपमाळ

प्रतिमा: मिरियम्स-फोटोस (स्रोत: पिक्साबे)

व्हिडिओ

आपल्या ख्रिस्ती जीवनप्रवासात प्रार्थना अत्यावश्यक आहे. प्रार्थना करताना देवाशी मनापासून बोलणे आणि त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करणे चांगले आहे. पण तुमची प्रार्थना तुमच्या श्रद्धेशी आणि देवाविषयी तुम्हाला जे काही माहीत आहे त्याच्याशी सुसंगत असली पाहिजे. तिच्यातून देवाविषयीचे तुमचे खरे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे आणि त्याच्या दयेची याचना केली पाहिजे. दैवी दयेची जपमाळ ही अशी एक प्रार्थना आहे, जिच्यातून देवाच्या दयेवरील तुमची श्रद्धा पूर्णपणे व्यक्त होते. (पाहा दैनंदिनी #475-476).

तुम्ही प्रार्थना करता का? दररोज प्रार्थना करता का? तुमची प्रार्थना श्रद्धा आणि सत्य यांवर आधारलेली आहे का, जेणेकरून तुम्ही सतत देवाच्या दयेची याचना करू शकाल? तुम्ही दैवी दयेची जपमाळ म्हणत नसाल, तर आठवडाभर ती दररोज म्हणून पाहा. ही प्रार्थना निष्ठेने म्हणा आणि तिच्या शब्दांतून प्रकट होणाऱ्या श्रद्धेवर भरवसा ठेवा. ही प्रार्थना निष्ठेने म्हणण्याचा तुम्ही निश्चय केला, तर देवाच्या दयेची दारे उघडताना तुम्हाला दिसतील.

हे सनातन पित्या, आमच्या आणि संपूर्ण जगाच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी मी तुला तुझ्या परमप्रिय पुत्राचे, आमचे प्रभू येशू ख्रिस्त यांचे, शरीर आणि रक्त, आत्मा आणि देवत्व अर्पण करतो. त्याच्या दुःखमय यातनांखातर आमच्यावर आणि संपूर्ण जगावर दया कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पास्का काळातील प्रार्थना

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण