मराठी

चिंतन 264: येशूसोबत आध्यात्मिक साधना

तुम्ही कधी आध्यात्मिक साधनेत सहभागी झाला आहात का?  काहींना जीवनाच्या धावपळीतून बाजूला होऊन आपल्या प्रभूचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्याच्या दयामय सान्निध्यात बराच वेळ घालवण्याची संधी मिळते.  तर काहींना अशा साधनेसाठी एक दिवस काढणेही कठीण जाते.  तरीही…

पुढे वाचा

चिंतन 263: वादळात देव तुमचा सुकाणूधारक

कल्पना करा की तुम्ही एक लहान मूल आहात आणि भर समुद्रात एका छोट्या होडीत आहात.  वादळ उठते आणि तुम्हाला कोणत्याही दिशेला किनारा दिसत नाही.  लाटांच्या प्रत्येक तडाख्याने होडीचे पुढचे टोक पाण्याखाली जाते, तुम्ही होडीत या बाजूला त्या बाजूला फेकले जाता आणि यातून आपण कसे वाचणार, असा प्रश्न तुम्हाला पडतो.  आता कल्पना करा की तुमचे बाबा…

पुढे वाचा

चिंतन 262: प्रेमाचा नियम की न्यायाचा नियम?

देवाच्या हातातून आपण निसटू शकत नाही.  तोच विश्वाचा आधार आहे आणि सर्व गोष्टींचे अस्तित्व टिकवून ठेवतो.  त्याची सततची काळजी नसती, तर आपले अस्तित्वच उरले नसते.  पण आपला सांभाळ करणाऱ्या त्याच्या हाताखाली आपण दोनपैकी एका प्रकारे राहतो.  आपल्याला एकतर ‘प्रेमाचा नियम’ मार्ग दाखवतो किंवा ‘न्यायाचा नियम’.  …

पुढे वाचा

चिंतन 261: इतरांमध्ये दडलेला येशू

कल्पना करा की येशू दीन अवस्थेत, उपाशीपोटी आणि थंडीने कुडकुडत तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला त्याची काळजी घ्यायला सांगितले.  अशा अनुभवाने तुम्ही दचकून जाल आणि ‘ही व्यक्ती खरोखर येशू आहे का?’ असा प्रश्न तुम्हाला पडेल.  पण तो येशूच आहे.  येशू दररोज गरजू व्यक्तीच्या रूपाने आपल्याकडे येतो.  कदाचित…

पुढे वाचा

चिंतन 260: प्रेमाच्या छोट्या कृतींचे अपार महत्त्व

या जगात काहीतरी अद्भुत करून दाखवावे, असे तुम्हाला वाटते का? कधी तुमच्या मनात भव्य कल्पना आणि स्वप्ने येतात का? कधी आपण संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवण्याची लौकिक स्वप्ने पाहतो, तर कधी देवासाठी आणि ख्रिस्तसभेसाठी काहीतरी असामान्य करण्याची स्वप्ने पाहतो. पण ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहायला हवीत असे नाही…

पुढे वाचा

चिंतन 259: नम्र आत्म्याचे सौंदर्य

एखाद्या व्यक्तीला खरे सौंदर्य कशामुळे लाभते? इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा नम्रतेच्या सद्गुणामुळे. नम्रतेत विलक्षण आकर्षण असते. सुरुवातीला काहींवर नम्र व्यक्तीची फारशी छाप पडत नाही; पण कालांतराने नम्रता अगदी गर्विष्ठ आणि आत्मकेंद्रित व्यक्तीलाही आपल्याकडे ओढून घेते. हे…

पुढे वाचा

चिंतन 258: देवाची जवळीक

देव कुठे आहे? देव स्वर्गात किंवा कुठेतरी दूर आहे, तिथून तो आपल्याकडे पाहतो आणि आपल्या पवित्र इच्छेनुसार संपूर्ण सृष्टीला दिशा देतो, असे सहज वाटू शकते. हे खरे आहे, पण हे संपूर्ण चित्र नाही. देव पूर्णपणे ‘सर्वातीत’ आहे, म्हणजेच तो आपल्या आणि साऱ्या सृष्टीच्या कितीतरी पलीकडे आहे. पण तो…

पुढे वाचा

चिंतन 257: देवाची दीर्घकालीन योजना

तुम्ही मनापासून आपल्या प्रभूची सेवा करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या त्या दिवशी त्याची काय इच्छा आहे, हे तो तुम्हाला सांगत असल्याचे जाणवू शकते. ते अगदी स्पष्ट नसेल, तरी तुम्ही अमुक एखादी गोष्ट करावी अशी त्याची इच्छा आहे, असे तुम्हाला जाणवू शकते. तुमच्या जीवनासाठी देवाने आखलेली संपूर्ण योजना तो सहसा तुम्हाला एकाच वेळी…

पुढे वाचा

चिंतन 256: आपल्याकडून होईल तितके उत्तम करणे

संत मदर तेरेसा यांचे हे वचन अनेकदा उद्धृत केले जाते: देव आपल्याकडून यशाची नव्हे, तर निष्ठेची अपेक्षा करतो. दुसऱ्या शब्दांत, प्रभूच्या पवित्र इच्छेशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत, आपल्या परीने जे उत्तम करता येईल ते त्याला अर्पण करावे आणि बाकीचे त्याच्यावर सोपवावे, असे आवाहन आपल्याला केले आहे. कधीकधी आपल्या ‘सर्वोत्तम प्रयत्नांनाही’ अपेक्षित चांगले फळ मिळत नाही, असे वाटू शकते…

पुढे वाचा

चिंतन 255: पापाचा “आशीर्वाद”

हे शीर्षक जरा विचित्र वाटेल. पाप हा “आशीर्वाद” कसा असू शकतो? खरे तर, काटेकोर अर्थाने पाप हा देवाविरुद्ध केलेला अपराध आहे आणि त्यामुळे आपण देवापासून दूर जातो. म्हणून काटेकोर अर्थाने पाप हा आशीर्वाद नाही. पण देव सर्वशक्तिमान आहे आणि आपल्या गौरवासाठी तो सर्व गोष्टींचा उपयोग करू शकतो…

पुढे वाचा