मराठी

चिंतन 157: नैतिक निर्णय कसे घ्यावेत?

नैतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे तुम्हाला कधी कठीण जाते का? आपल्या पतित मानवी स्वभावामुळे असे घडते. जीवनात आपण सहज गोंधळून जातो आणि देवाच्या मनात काय आहे व त्याची इच्छा काय आहे, हे आपल्याला समजेलच असे नाही. मग तुम्ही काय करावे? तुमची सदसद्विवेकबुद्धी हे एक पवित्र स्थान आहे, जिथे…

चिंतन 152: दुःखातून मिळणाऱ्या कृपेचे रहस्य

मानवी दुःख हे जीवनातील सर्वांत मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. संत फॉस्टिनांची दैनंदिनी आणि आपल्या श्रद्धेची संपूर्ण आध्यात्मिक परंपरा दुःखाच्या या गहन रहस्यावर बराच प्रकाश टाकतात. सर्वप्रथम, निव्वळ लौकिक दृष्टिकोनातून पाहिले तर दुःख कोणालाही नकोसे वाटते. किंबहुना, ते कोणत्याही किंमतीत टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती सर्वांत मोठी शोकांतिका मानली जाते. पण ख्रिस्ती दृष्टिकोनातून पाहिले तर दुःखाचेच…

चिंतन 134: आपल्या सामूहिक श्रमांची गोडी

मधमाशी दिवसेंदिवस मेहनत करते. वसाहतीतल्या सगळ्या मधमाश्या निसर्गतः एकाच उद्देशाने काम करतात. त्या मध तयार करतात. हे काही सोपे काम नाही. थोडासा मध तयार करण्यासाठीही हजारो मधमाश्यांना सतत श्रम करावे लागतात. पण शेवटी त्यांच्या श्रमांचे फळ मिळते…

चिंतन 113: सनातन पित्याला अर्पण

आपण करू शकणारी सर्वश्रेष्ठ प्रार्थना म्हणजे “अर्पणाची प्रार्थना.” अर्पणाची प्रार्थना म्हणजे वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या एकमेव बलिदानाशी एकरूप होऊन पित्याला केलेले बलिदान. आपण स्वतःला केवळ आपल्या बळावर अर्पण करत नाही. ख्रिस्त येशूशी एकरूप होऊन आपण स्वतःला अर्पण करतो. नेमके सांगायचे तर…

चिंतन १०८: ख्रिस्तसभेचा आवाज

देव संतांशी अनेक प्रकारे बोलला आहे. त्याने त्यांच्या अंतःकरणात दिलेल्या अनेक कृपादानांद्वारे आणि प्रेरणांद्वारेही तो त्यांच्याशी बोलला आहे. पण पवित्रतेचे सर्वोच्च शिखर गाठलेल्या गूढानुभवी व्यक्तीलाही अखेरीस देवाचा जो आवाज त्याच्या ख्रिस्तसभेद्वारे ऐकू येतो, त्यापुढे नम्रपणे मान तुकवावी लागते. ख्रिस्तसभा, विशेषतः…

चिंतन 83: सदैव प्रार्थना करा

‘सदैव’ प्रार्थना करणे अशक्य वाटू शकते. पण हे खरोखर शक्य आहे का? देव खरेच आपल्याकडून अशी अपेक्षा करतो का? हो, हे नक्कीच शक्य आहे आणि देवही आपल्याकडून तशी अपेक्षा नक्कीच करतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला रोज दिवसभर चर्चमध्ये प्रार्थना करत बसण्याचे पाचारण आहे. ज्यांना पाचारण झाले आहे, तेही…

चिंतन 361: त्याग आणि प्रार्थना

हे समजून घेणे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण वाटले, तरी शुद्ध प्रार्थनेशी जोडलेला अंतःकरणातील त्याग जगभर सुवार्तेच्या घोषणेसाठी अतिशय फलदायी ठरतो. खरे तर, दररोज अंतःकरणातून अर्पण करणाऱ्या पवित्र आत्म्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे पाठबळ धर्मप्रसारकांना लाभले नसते तर…

चिंतन 351: देवाला जाणणे की त्याचा अनुभव घेणे

देवाला जाणून घेणे हे तुमचे नेहमीचे ध्येय असले पाहिजे. पवित्र शास्त्राचा अभ्यास, ख्रिस्तसभेची शिकवण आणि संतांची जीवनचरित्रे या सर्वांची या प्रयत्नात मदत होते. पण देवाला जाणणे हे जीवनाचे अंतिम ध्येय नाही. ज्ञान श्रद्धेतून येते आणि श्रद्धा ही देवाची देणगी आहे. पण पूर्णपणे…

चिंतन 348: देव जे प्रकट करतो ते पूर्ण करतो

दोन गोष्टींचा एकत्र विचार केला तर आश्चर्य वाटते. पहिली गोष्ट अशी की, दरवर्षी ईस्टरच्या दुसऱ्या रविवारी दैवी दयेचा सण साजरा करण्याची अधिकृत घोषणा व्हावी आणि तो सण साजरा केला जावा, अशी आपली इच्छा असल्याचे येशूने संत फॉस्टिनाला वारंवार सांगितले आणि तिने ते ऐकले. मठात एकांतवासात राहणाऱ्या या साध्या धर्मभगिनीला असे काम कसे साधणार होते…