मराठी

चिंतन 84: पवित्र ख्रिस्तप्रसाद

परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तावर आपण कितीही गाढ प्रेम केले आणि कितीही भक्तिभावाने त्याची आराधना केली, तरी ते पुरेसे ठरणार नाही. परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तासमोर आपण असतो, तेव्हा त्या रूपाआड खरोखर उपस्थित असलेला सर्वशक्तिमान देव आपल्याला दिसला पाहिजे. तोच दया, शाश्वत जीवन, सनातन…

चिंतन 81: सामर्थ्य आणि दया

एखाद्या देशाच्या हुकूमशहाची कल्पना करा. त्याच्या हातात अमर्याद सत्ता आहे आणि तो अतिशय संतापी, दुष्ट व सूडबुद्धीचा आहे. अशा माणसाचा रोष ओढवून घ्यायला तुम्हाला आवडणार नाही. आता याच्या अगदी उलट कल्पना करा. ज्याच्याकडे अमर्याद सत्ता आहे आणि ज्याच्या हृदयात निखळ…

चिंतन 80: आपल्या मृत्यूच्या घटकेला

तुम्ही ‘नमो मरिये’ ही प्रार्थना म्हटली असेल, तर या जगातील तुमच्या शेवटच्या घटकेसाठीही तुम्ही प्रार्थना केली आहे: “आता आणि आमच्या मृत्यूच्या घटकेला आमच्यासाठी प्रार्थना कर.”  अनेकांना मृत्यूची भीती वाटते, आणि आपल्या मृत्यूच्या घटकेचा विचार करावासा सहसा आपल्याला वाटत नाही.  पण…

चिंतन 77: प्रभूला सर्व काही माहीत आहे

आपल्या दैवी प्रभूला सर्व काही माहीत आहे, यात शंका नाही.  आपल्या मनातला प्रत्येक विचार आणि आपली प्रत्येक गरज तो जाणतो, याची व्याप्ती आपल्याला कधीही पूर्णपणे समजणार नाही.  त्याच्या परिपूर्ण ज्ञानाची जाणीव होऊ लागते तेव्हा कधीकधी आपण अशी अपेक्षा करतो की तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करील, जरी आपण…

चिंतन 76: अन्याय्य आरोप

कदाचित प्रत्येकावर कधी ना कधी कोणीतरी अन्याय्य आरोप केला असेल. वस्तुस्थितीबद्दल किंवा आपल्या कृतीमागच्या हेतूबद्दल त्या व्यक्तीचा खरोखरच गैरसमज झाला असेल. किंवा तो आरोप अधिक द्वेषपूर्ण आणि क्रूर हेतूने केला गेला असेल. आपल्यावर खोटा आरोप होणे फार वेदनादायक असू शकते आणि…

चिंतन 74: करुणामय हृदय

‘सहानुभूती’ आणि ‘करुणा’ यांत काही फरक आहे का? असेल तर तो काय? आणि यांपैकी कोणती अधिक इष्ट आहे? सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपल्याला वाईट वाटणे. एका अर्थी, आपल्याला त्या व्यक्तीची कीव येते. पण करुणा याहीपलीकडे जाते. तिचा अर्थ असा की आपण…

चिंतन 73: येशूविषयीची आपली ओढ वाढत जाणे

येशूची ओळख आपल्याला जितकी अधिक होते, तितकी त्याच्याविषयीची आपली ओढ वाढते. आणि त्याच्याविषयीची ओढ जितकी वाढते, तितकी त्याची ओळख अधिक सखोल होते. ओळखीतून ओढ वाढण्याचा आणि ओढीतून ओळख सखोल होण्याचा हा सुंदर अनुभव आहे (रोजनिशीतील परिच्छेद 273 पाहा)…

चिंतन ७२: आकलनापलीकडचे एक रहस्य

देव तुमच्या आत्म्यात प्रवेश करतो, तेव्हा तो अशा रीतीने कार्य करतो की त्याचे कार्य तुम्हाला कधीच पूर्णपणे समजणार नाही. त्याची कृपा आणि दया हे असे रहस्य आहे की ते महासागरांहून खोल आहे आणि विश्वाच्या दूरच्या सीमांपलीकडेही विस्तारलेले आहे. हे स्वरूप आपल्या आकलनापलीकडे आहे, हे समजून घेणे…

चिंतन 66: दयेद्वारे न्याय

काही जणांना दिवसेंदिवस दुसऱ्या व्यक्तीच्या कठोर आणि क्रूर वागणुकीला सामोरे जावे लागते. हे फार वेदनादायक असते. त्यामुळे, दुःख देणाऱ्या व्यक्तीला तिच्या कृत्यांचा जाब विचारला जावा आणि न्याय मिळावा, अशी तीव्र इच्छा होऊ शकते. पण खरा प्रश्न असा आहे: प्रभू मला काय करायला बोलावत आहे? मी कसा प्रतिसाद देऊ…

चिंतन 63: तुम्ही इतरांशी कसे बोलता?

इतरांशी बोलताना आपल्या ओठांतून देवाचे प्रेम आणि दया झळकली पाहिजे. पण हे कसे साधेल? आपले बोलणे कसे असावे? आपण देवाशी कसे बोलावे, हे लक्षात घेऊन इतरांशी बोलण्याची आपली रीत तपासता येईल. देवाशी बोलताना आपण प्रामाणिकपणे बोलले पाहिजे…