मराठी

चिंतन 319: एकटेपणाला सामोरे जाताना

एकटेपणा ही अनेकांना सोसावी लागणारी खोल वेदना आहे. ती इतकी बोचते, याचे एक कारण म्हणजे एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तीला ती वेदना एकट्यानेच सोसावी लागते. तिचे दुःख हलके करायला फार थोडी माणसे असतात, कधी तर कोणीच नसते. तसे नसते, तर त्या व्यक्तीला एकटेपणा जाणवला नसता. विशेष म्हणजे, ज्यांच्या भोवती इतर माणसे असतात त्यांनाही..

चिंतन 309: इतरांशी संवाद

आपण जेव्हा कोणाशी बोलतो, तेव्हा देवाचे प्रेम त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला नेहमीच असते. अगदी सहज गप्पांतूनही हे शक्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील तपशील लक्षपूर्वक ऐकल्याने तुम्हाला तिची काळजी आहे, तिच्याबद्दल आस्था आहे आणि तिच्या अंतर्निहित प्रतिष्ठेची तुम्हाला जाणीव आहे, हे दिसून येते…

चिंतन 300: आपल्या आत्म्यात दडलेली गुपिते उघड करणे

ज्याच्यापाशी आपल्या मनातल्या अगदी खोलवरच्या गोष्टी मोकळेपणाने सांगता येतात, अशी एखादी व्यक्ती असणे खरोखरच दिलासादायक असते. तुम्ही सांगितलेले पूर्णपणे गुप्त ठेवणारी आणि तुमच्याशी दयेने व समजूतदारपणे वागणारी अशी विश्वासू व्यक्ती लाभणे हा मोठा आशीर्वाद आहे. अगदी आपल्या पापांविषयीही निःसंकोचपणे बोलणे…

चिंतन 289: आत्म्यांच्या तारणाची तळमळ

आपल्या हृदयातील इच्छांकडे पाहता, कोणती इच्छा सर्वांत ठळकपणे जाणवते? तुम्हाला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी नक्कीच आहेत. अनेक ऐहिक लाभ आणि सुखे सहजच तुमच्या आकांक्षांचा केंद्रबिंदू बनू शकतात. शारीरिक सुख, पैसा आणि ऐहिक यश यांच्या इच्छा सर्वांत प्रबळ इच्छांपैकी आहेत…

चिंतन 269: दया आणि दुःख या दोन्हींकडे एक नजर

निरखून पाहण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी निवडता आल्या, तर तुम्ही कोणत्या निवडाल? खरे तर, त्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे देवाची दया आणि तुमचे स्वतःचे दुःख. देवाची दया ही निरखून पाहण्यासारख्या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे, हे बहुधा तुम्हाला लगेच पटेल…

चिंतन 261: इतरांमध्ये दडलेला येशू

कल्पना करा की येशू दीन अवस्थेत, उपाशीपोटी आणि थंडीने कुडकुडत तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला त्याची काळजी घ्यायला सांगितले.  अशा अनुभवाने तुम्ही दचकून जाल आणि ‘ही व्यक्ती खरोखर येशू आहे का?’ असा प्रश्न तुम्हाला पडेल.  पण तो येशूच आहे.  येशू दररोज गरजू व्यक्तीच्या रूपाने आपल्याकडे येतो.  कदाचित…

चिंतन 247: गरजू व्यक्ती आपल्यासाठी आशीर्वाद

तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल, तुरुंगात असेल किंवा तिला एखाद्या गंभीर परिस्थितीत मदतीची नितांत गरज असेल, तर ती परिस्थिती तुम्हाला ओझे वाटेल की आशीर्वाद? याचा विचार करा. विशेष काळजीची गरज असलेल्या व्यक्तींमुळे तुमचे जीवन अधिक कठीण होते का? या प्रश्नाचे उत्तर केवळ व्यवहाराच्या दृष्टीने दिले, तर…

चिंतन 239: दयेचा शिक्का

प्रत्येक थोर संताच्या जीवनात देवाच्या चांगुलपणाचा एखादा पैलू दिसून येतो. काही संत ऐहिक संपत्तीपासून विलक्षण अलिप्त राहतात, काही अढळ निष्ठेने गरिबांची सेवा करतात, काही गहन प्रार्थनेत जीवन घालवतात, काहींना गूढ प्रकटीकरणे लाभतात, तर काही अनेक ग्रंथ लिहितात…

चिंतन 226: दयेचे चांगले फळ

आपल्या प्रभूचे हृदय इतरांप्रती परिपूर्ण दयेने भरलेले होते. त्याची दया ही केवळ एक सर्वसाधारण कल्पना नाही, तर ती प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे…

चिंतन 220: व्याकूळ आत्मा

काही जणांना आपल्या आत्म्याच्या गाभ्यात तीव्र यातना जाणवतात. कधी या यातना पापामुळे होतात, तर कधी देवाच्या एका विशेष दयेमुळे आत्म्याला येशूने सोसलेल्या यातनांचा अनुभव घेता येतो. कारण काहीही असो, जर तुम्हाला…