मराठी

चिंतन ४०: आपल्या प्रभूच्या हृदयात प्रवेश

बहुतेक परिस्थितीत धुळीचा एखादा कण किंवा वाळूचा एखादा दाणा फारसा महत्त्वाचा वाटत नाही. अंगणात किंवा घराच्या जमिनीवर पडलेल्या अशा एखाद्या कणाकडे कोणाचेही लक्ष जात नाही. पण तोच कण डोळ्यात गेला तर तो लगेच जाणवतो. का? कारण…

चिंतन 33: शुद्धीकरणातील दया

कल्पना करा, देव तुमच्या आत्म्याकडे जसा पाहतो, तसा तुम्हालाही तो पाहता आला तर?  तुम्हाला काय दिसेल?  देव तुमच्या आत्म्याकडे कसा पाहत असेल?  तुम्ही त्याचे अनमोल लेकरू आहात, हे तो नक्कीच पाहतो आणि तो तुमच्याकडे अपार प्रेमाने पाहतो.  पण त्याला तुमचे पापही दिसते, अगदी क्षुल्लक पापसुद्धा.  ही पापे आणि अगदी लहानात लहान दोषही…

चिंतन ३२: क्षमेतून प्रकटणारी दया

आयुष्यभर इतरांच्या पापांमुळे तुम्ही दुखावले जाल. हे अटळ आहे. खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की, या दुःखाचे तुम्ही काय कराल? ते मनात धरून त्याचाच विचार करत राहाल का? की तुम्ही क्षमा कराल? पण केवळ क्षमा करणे पुरेसे नाही. दैवी दयेला तुमच्या आत्म्यात इतके खोलवर उतरू दिले पाहिजे की…

चिंतन 342: ख्रिस्ताच्या दुःखसहनातून लाभणारा विसावा

सहसा आपण “दुःखसहन” आणि “विसावा” हे शब्द एकत्र वापरत नाही. ख्रिस्ताच्या दुःखसहनातून विसावा कसा लाभू शकतो? मानवी नजरेतून पाहिले तर त्यात केवळ भय आणि दुःखच दिसते. प्रभूने अपार यातना सोसल्या आणि आपल्या धन्य मातेनेही त्याच्यासोबत त्या सोसल्या, तेही अत्यंत दुःखी…

चिंतन 338: गुपित जपणे

कोणी आपल्याला विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे, ही त्या व्यक्तीवर प्रेम करण्याची एक रीती आहे.  कोणी अडचणीत किंवा संभ्रमात असताना आपल्याकडे येते आणि सांगितलेली गोष्ट आपल्यापुरतीच ठेवायला सांगते, असा अनुभव आपल्या सर्वांनाच आला आहे.  अशा प्रकारचे पवित्र गुपित तुम्ही जपू शकता का?  इतरांनी विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे, ही त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याची एक सुंदर रीती आहे.  जर…

चिंतन 337: इतरांना त्यांच्या चिंतेत मदत करणे

आपल्या आयुष्यात अस्वस्थ, व्यथित किंवा काळजीत असलेली माणसे अधूनमधून भेटतातच. एखाद्या गोष्टीचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत राहू शकतो; कधी कधी त्यांच्या विचारांत फारसा तर्कही नसतो. दया दाखवण्याची ही किती कृपामय संधी आहे! चिंता…

चिंतन 335: सदैव क्षमा करणे 

जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्याशी अत्यंत आदराने व करुणेने वागणे, ही जीवनातील सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक आहे. पण त्यांचा द्वेष करून किंवा त्यांच्यावर राग काढून काय साधते? असे करून तुम्ही त्यांची जी “हानी” करता, तिच्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या आत्म्याची कितीतरी जास्त हानी होते. क्षमा करा…

चिंतन 334: आत्म्यांची सेवा

इतरांची सेवा करण्याची क्षमता हा आपल्याला मिळालेल्या सर्वांत मोठ्या आशीर्वादांपैकी एक आहे.  आपण अनेक प्रकारे त्यांची सेवा करतो, विशेषतः आपापल्या जीवनपाचारणाला अनुसरून.  पण देवाच्या दयेचे सेवक बनून एखाद्या व्यक्तीला त्या वैभवाकडे नेणे, हीच आपण त्या व्यक्तीची करू शकणारी सर्वांत मोठी सेवा आहे…