मराठी

चिंतन 107: पापस्वीकारात आपला आत्मा उघड करणे

देव आपल्या याजकांना त्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे पाठवतो. याजक परिपूर्ण नसले, तरी ते देवाचे प्रतिनिधी आहेत. समेटाच्या संस्कारात ही गोष्ट विशेषतः खरी ठरते. आपण या संस्कारासाठी जाणे अत्यावश्यक आहे…

चिंतन १०२: देव दुर्बलांद्वारे कार्य करतो

तुम्ही देवाच्या जागी असता आणि एखादे गौरवशाली कार्य पूर्ण व्हावे अशी तुमची इच्छा असती, तर तुम्ही कोणाला निवडले असते? ज्याच्यात ठळक गुण दिसतात अशा एखाद्याला? की जो दुर्बल व नम्र आहे आणि ज्याच्यात फारच थोड्या नैसर्गिक देणग्या आहेत असे दिसते, अशा एखाद्याला? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देव बहुतेकदा दुर्बलांचीच निवड करतो…

चिंतन 99: पापाचे फटके

येशूला इतके दुःख का सोसावे लागले? त्याला चाबकाचे इतके निर्दय फटके का मारण्यात आले? त्याचा मृत्यू इतका वेदनादायक का होता? कारण पापाचे परिणाम होतात आणि पापातून फार मोठे दुःख उद्भवते. पण स्वतः निष्पाप असूनही येशूने स्वेच्छेने दुःख स्वीकारले आणि त्यामुळे परिवर्तन घडले…

चिंतन 98: देवाचे साधन होणे

देव आपल्याला एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी बोलावतो, तेव्हा कार्य कोण करतो? देव की आपण? खरे तर देव आणि आपण दोघेही कार्य करतो. देव हा उगम आहे आणि आपण त्याचे साधन आहोत. आपण आपल्या स्वेच्छेने प्रयत्न करतो, पण आपल्यातून झळकणारा देवच असतो. जशी खिडकी प्रकाशाचा स्रोत असल्यासारखी वाटू शकते…

चिंतन 71: आपला लहानपणा आणि आपली शून्यता

आपण खरोखर जसे आहोत तसे स्वतःला पाहता येणे ही देवाची कृपा आहे. आणि अशा नजरेने स्वतःकडे पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपले दैन्य आणि आपली शून्यता दिसेल. सुरुवातीला असे पाहणे आपल्याला फारसे रुचणार नाही. ख्रिस्तामध्ये आपल्याला लाभलेल्या प्रतिष्ठेशी हे विसंगत आहे, असेही वाटू शकते. पण नेमका मुद्दा हाच आहे. आपली…

चिंतन 63: तुम्ही इतरांशी कसे बोलता?

इतरांशी बोलताना आपल्या ओठांतून देवाचे प्रेम आणि दया झळकली पाहिजे. पण हे कसे साधेल? आपले बोलणे कसे असावे? आपण देवाशी कसे बोलावे, हे लक्षात घेऊन इतरांशी बोलण्याची आपली रीत तपासता येईल. देवाशी बोलताना आपण प्रामाणिकपणे बोलले पाहिजे…

चिंतन 37: नम्रता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा

आज तीन शब्दांवर चिंतन करूया: नम्रता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा. नम्र जीवांना देव दिसतो आणि ते त्याला ओळखतात, कारण गरजेच्या वेळी ते स्वतःवर अवलंबून राहत नाहीत. देवच सर्वस्व आहे आणि त्याच्याविना आपण काहीच नाही, हे ते जाणतात. साध्या मनाचे जीव गुंतून पडत नाहीत…

चिंतन ३२: क्षमेतून प्रकटणारी दया

आयुष्यभर इतरांच्या पापांमुळे तुम्ही दुखावले जाल. हे अटळ आहे. खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की, या दुःखाचे तुम्ही काय कराल? ते मनात धरून त्याचाच विचार करत राहाल का? की तुम्ही क्षमा कराल? पण केवळ क्षमा करणे पुरेसे नाही. दैवी दयेला तुमच्या आत्म्यात इतके खोलवर उतरू दिले पाहिजे की…

चिंतन 31: देवाचे अगम्य स्वरूप

देवाचे मूलतत्त्व काय आहे, हे आपल्याला जाणता येत नाही. तो आपल्या आकलनापलीकडे आहे; त्याचा थांग आपल्याला लागत नाही. पण आपल्या जीवनात आणि जगात तो जे करतो, ते पाहून आपण त्याला ओळखू शकतो. त्याच्या गुणांकडे पाहा. त्याच्या कार्यांकडे पाहा. तुमच्या जीवनात आणि इतरांच्या…

चिंतन 30: देवाच्या आज्ञांचे पालन

आज्ञापालन हा पवित्रतेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.  आज्ञाभंगामुळे आदाम आणि हव्वा देवाच्या कृपेला मुकले, तर आज्ञापालनामुळे आपल्याला ती कृपा पुन्हा लाभते.  आज्ञापालन कठीण जाऊ शकते आणि त्यासाठी अंतःकरणातून ठाम निर्णय घ्यावा लागतो.  येशूच्या आज्ञा पाळण्याच्या संधी शोधा, विशेषतः जेव्हा तुम्हाला…