मराठी

चिंतन 325: संतांवर विसंबून राहणे

ज्याने आपले संपूर्ण जीवन देवाला पूर्णपणे समर्पित केले, अशा एका जीवात्म्याची कल्पना करा. त्या जीवात्म्याने पावित्र्याचे शिखर गाठले आणि सांसारिक गोष्टींनी त्याला आपल्या मार्गापासून विचलित केले नाही. आयुष्यभर आपल्या प्रभूची सेवा करण्याचा आणि इतरांसाठी देवाच्या दयेचे साधन म्हणून सतत कार्य करण्याचा त्याने प्रयत्न केला. अनेक…

चिंतन 165: परिपूर्ण पश्चात्ताप

आपल्या पापांची जाणीव झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. आपण उदासीन राहू शकतो किंवा देवाच्या न्यायाच्या भीतीने पश्चात्ताप करू शकतो. पण सर्वांत योग्य प्रतिसाद म्हणजे प्रेमाने देवाकडे वळणे आणि त्या प्रेमामुळे आपल्या पापांबद्दल मनापासून दुःख वाटणे. आपल्या मनात देवाविषयी उत्कट प्रेम असेल तर…

चिंतन 156: प्रभू आपला आश्रय आहे

जीवनात कधी कधी मनात भीती शिरते. कदाचित तुमच्यासमोर एखादे अवघड काम असेल किंवा ज्या वाटेवर तुम्ही चालत आहात, तिथे पुढे काय असेल हे तुम्हाला माहीत नसेल. अशा आणि इतर अनेक अनुभवांमुळे मनात भीती आणि चिंता निर्माण होऊ शकतात. पुढे काय होईल हे माहीत नसल्याची भीती…

चिंतन 28: तक्रार करण्याचे मोह

कधीकधी आपल्याला तक्रार करण्याचा मोह होतो. देवावर, त्याच्या परिपूर्ण प्रेमावर आणि त्याच्या परिपूर्ण योजनेवर प्रश्न उपस्थित करण्याचा मोह होतो तेव्हा हे लक्षात ठेवा की तो केवळ एक मोह आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही…

चिंतन १६: देवाच्या हाती स्वतःला पूर्णपणे सोपवणे

देवासमोर नतमस्तक व्हा. त्याच्यासमोर साष्टांग दंडवत घाला. शक्य असेल तर प्रत्यक्ष तसे करा. त्यामुळे इतरांचे लक्ष विचलित होणार असेल, तर मनोमन तसे करा. देवासमोर साष्टांग दंडवत घालून त्याला कळकळीने विनवा की त्याने तुम्हाला आपली दैवी दया आणि आपली परमपवित्र इच्छा प्रकट करावी. असे अनेक प्रसंग येतात…