मराठी

चिंतन 314: दया हे संरक्षणाचे भक्कम कवच

सैन्याला वेढा पडला की ते स्वतःचा बचाव करता येईल अशी जागा शोधते. ते लगेच एखादी उंच जागा किंवा आसरा आणि संरक्षण मिळेल असे ठिकाण शोधू लागते. तुझ्या आध्यात्मिक जीवनातही असेच असले पाहिजे. जेव्हा त्या दुष्टाचे बाण तुझ्यावर येतात किंवा जेव्हा जीवन…

चिंतन ३०६: देव आपल्या प्रयत्नांत थांबत नाही

तुम्हाला देवाच्या प्रेमाबद्दल शंका वाटते का? खरे तर, तुम्हाला आपलेसे करण्याचा प्रयत्न देव कधीच सोडत नाही. आपल्या पवित्रतेसाठी आपला प्रयत्न महत्त्वाचा असला, तरी ती मुख्यतः देवावर अवलंबून असते. तुम्ही या पृथ्वीवर असताना देव तुम्हाला शोधण्याचे आणि तुमचे मन त्याच्याकडे वळावे यासाठी प्रयत्न करण्याचे कधीच थांबवत नाही. तो आपली दया पाठवतो…

चिंतन 285: “प्रकाशाचा देवदूत” बनून फसवणूक

सैतान तुमचा तीव्र द्वेष करतो. देवाच्या दैवी इच्छेप्रमाणे वागत तुम्ही जितके त्याच्या जवळ जाल, तितकाच सैतान तुमच्यावर हल्ला करण्याचा अधिक प्रयत्न करेल. या छोट्या कुत्र्याच्या भुंकण्याला घाबरू नका. तुम्हाला फसवण्यासाठी सैतान अनेकदा स्वतःला प्रकाशाचा देवदूत म्हणून भासवतो. हे करण्यासाठी तो…

चिंतन 212: शंकेवर मात

‘शंका’ म्हणजे काय? शंका घेणे म्हणजे श्रद्धा नसणे; आणि श्रद्धा नसणे म्हणजे देवाने आपली इच्छा ज्या परिपूर्ण रीतीने प्रकट केली आहे त्यावर आणि त्याच्या योजनेवर भरवसा नसणे. सर्वांत आधी हे लक्षात घ्या: श्रद्धेच्या अभावातून शंका येते, याचा अर्थ तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. जेव्हा आपण देवाविषयी, त्याच्या योजनेविषयी आणि तो आपल्याला जे काही प्रकट करतो त्याविषयी शंका घेतो, तेव्हा आपण…

चिंतन 162: प्रकाश अंधार दूर करतो

प्रकाश अंधार दूर करतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता, प्रकाश आणि अंधार या परस्परविरोधी शक्ती नाहीत; अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. प्रकाश आला की अंधार उरत नाही. देवाच्या दयेचेही तसेच आहे. दयेशिवाय आपल्या आत्म्यात अंधार असतो. आपण शंकेच्या आणि गोंधळाच्या गर्तेत सापडतो…

चिंतन 95: देवाच्या दयेवर विश्वास ठेवणे

एखादी वस्तू तुम्ही अथांग समुद्राच्या मध्यभागी टाकली, तर ती भिजेल याची तुम्हाला पक्की खात्री असेल.  तो विशाल समुद्र तिला पूर्णपणे सामावून घेईल.  देवाच्या दयेचेही तसेच आहे.  ती अपार आणि असीम आहे.  म्हणून, जर तुम्ही विश्वास ठेवला तर…

चिंतन 69: अडचणींमुळे शंका घेण्याचा मोह होतो

आपल्या सर्वांनाच जीवनात अडचणी येतात.  प्रश्न असा आहे: “तुम्ही त्यांना कसे सामोरे जाता?”  अडचणी आल्या की देव खरोखर आपल्या सोबत आहे का, तो दयेने आपल्याला मदत करील का, अशी शंका घेण्याचा मोह आपल्याला कितीतरी वेळा होतो.  पण प्रत्यक्षात याच्या उलटच खरे आहे.  प्रत्येक अडचणीचे उत्तर देवच आहे.  तो…

चिंतन ३३२: क्रुसाचा कधीही शीण येऊ देऊ नका

प्रभू संत फॉस्टिनाशी दुःखांविषयी पुष्कळ बोलतो. अपमान आणि शारीरिक आजार यांमुळे तिने खूप दुःख सोसले. तिची दुःखे त्याच्या क्रुसाशी जोडली की त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होते, याची आठवण येशू तिला न थकता करून देत असे. हा संदेश कधीही…