मराठी

चिंतन 217: आळशी आणि निष्क्रिय आत्मा

देवाच्या गोष्टींबाबत आपण आपल्या आत्म्याला आळशी आणि निष्क्रिय होऊ देतो, तेव्हा आपण सैतानाला संतुष्ट करतो. निष्क्रिय आत्मा देवाच्या जीवनात सहभागी होण्याचा प्रयत्न करत नाही. असा आत्मा आध्यात्मिक बाबतीत सक्रिय असण्याऐवजी निष्क्रिय असतो. ‘निष्क्रिय’ असण्याचा अर्थ असा की ती व्यक्ती…

चिंतन 206: आध्यात्मिक साठेबाजी

आध्यात्मिक जीवनाला असलेल्या एका खऱ्या धोक्याला ‘आध्यात्मिक साठेबाजी’ असे म्हणता येईल. ही वृत्ती अशा व्यक्तीत दिसते, जी देवाच्या दयेचे साधन होण्याऐवजी ती दया स्वतःपुरतीच ठेवू पाहते. देवाची दया स्वतःपुरतीच ठेवण्याचा प्रयत्न करताना माणूस…

चिंतन 196: इतरांमधील येशूवर प्रेम करणे

शुभवर्तमानातील हे वचन आपल्या चांगलेच परिचयाचे आहे: “माझ्या भावांपैकी सर्वांत लहान अशा एकासाठी तुम्ही जे काही करता, ते माझ्यासाठी करता” (मत्तय 25:40). पण या वचनावर तुमचा विश्वास आहे का? असेल, तर येशूवर प्रेम करणे सोपे आहे आणि तसे करण्याची संधी तुम्हाला दिवसभर…

चिंतन 185: अमर्याद साधनसंपत्ती आणि उदारता

दूरच्या एखाद्या देशात भीषण दुष्काळ पडल्याचे तुम्हाला माहीत असते आणि त्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी देवाने तुम्हाला अमर्याद साधनसंपत्ती दिली असती, तर ही देणगी तुम्ही गरजूंपासून का रोखून धरली असती? आशा आहे की तुम्ही तसे केले नसते. तुम्ही आपली जबाबदारी ओळखून जे करणे आवश्यक होते ते केले असते, अशी आशा आहे…

चिंतन 184: पुरोहितांच्या सेवाकार्यातून लाभणारी दया

नाही, पुरोहित परिपूर्ण नाहीत.  त्यांच्याकडूनही दिवसेंदिवस पापे घडतात.  इतर सर्व माणसांप्रमाणेच त्यांनाही दैनंदिन जीवनात सतत पश्चात्ताप करण्याची आणि देवाकडे वळण्याची गरज असते.  तरीही ते पुरोहित आहेत.  आणि त्यांच्या पवित्र पुरोहिताभिषेकामुळे प्रभू त्यांच्याद्वारे स्पष्टपणे बोलतो, तरी…

चिंतन 168: इतरांसाठी देवाच्या दयेची याचना

पापी जनांना नरकाच्या अग्नीतून मुक्त करण्याचे सामर्थ्य एका आणि केवळ एकाच गोष्टीत आहे. ती म्हणजे दया. देव आपली दया विनामूल्य आणि विपुल प्रमाणात देतो; पण आपल्या प्रार्थनांनाही प्रतिसाद म्हणून दया दाखवण्याचे त्याने ठरवले आहे, जेव्हा आपण त्या प्रार्थना अशा भावनेने करतो की…

चिंतन 135: येशूशी संवाद

तुम्ही येशूशी संवाद साधता का?  प्रार्थनेचा हा एक अतिशय फलदायी प्रकार आहे.  देवाशी ‘संवाद’ साधणे हा प्रार्थनेचा सर्वोच्च प्रकार नाही, पण अनेकदा आपल्याला याच प्रकारच्या प्रार्थनेने सुरुवात करावी लागते.  मनावर एखादे ओझे असते, तेव्हा देवाशी संवाद साधणे विशेष फलदायी ठरते…

चिंतन 116: देव आपल्यावर अवलंबून असतो

देव पूर्णपणे स्वतंत्र आहे, कारण तो स्वतःचे अस्तित्व स्वतःच टिकवतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यात परिपूर्ण ऐक्य आहे. या ऐक्यात ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. हे परस्परावलंबन त्यांना पुरेसे आहे. तरीही, पवित्र त्रित्वाने स्वतःच्या इच्छेने अवलंबून राहण्याचे निवडले…

चिंतन 51: शुद्ध प्रेम

तुमचे प्रेम शुद्ध आहे का?  असे प्रेम कसे असते?  शुद्ध प्रेम थेट ख्रिस्ताच्या हृदयातून तुमच्या जीवनात येते आणि तुमच्या जीवनातून इतरांपर्यंत वाहते.  या पवित्र प्रेमाची काही सुंदर वैशिष्ट्ये आहेत.  पहिले म्हणजे, ते विपुल असते.  जेव्हा आपण ख्रिस्ताच्या हृदयाने प्रेम करतो, तेव्हा आपण भरभरून प्रेम करतो.  आपण…