मराठी

चिंतन 97: आपल्या दुर्बलतेची “सबब”

अगदी सुरुवातीपासून एखादे रॉकेटयान तयार करायला तुम्हाला सांगितले, तर या क्षेत्रात आपल्याकडे आवश्यक कौशल्य नाही आणि म्हणून सांगितलेले काम आपल्याला करता येणार नाही, असे तुम्ही म्हणाल. देवाच्या इच्छेबाबत देवाला आपणही अनेकदा असेच उत्तर देतो. आपल्याला सहज असे वाटू शकते की…

चिंतन 96: तुमच्यासाठी देवाची महान योजना

आपण सगळेच कधी ना कधी मोठेपणाची स्वप्ने पाहतो. मी श्रीमंत आणि प्रसिद्ध झालो तर? या जगात माझ्या हाती मोठी सत्ता आली तर? मी पोप किंवा राष्ट्राध्यक्ष झालो तर? पण एक गोष्ट नक्की आहे: देवाने आपल्यासाठी खरोखरच महान गोष्टी योजल्या आहेत. तो आपल्याला अशा महानतेकडे बोलावतो…

चिंतन 95: देवाच्या दयेवर विश्वास ठेवणे

एखादी वस्तू तुम्ही अथांग समुद्राच्या मध्यभागी टाकली, तर ती भिजेल याची तुम्हाला पक्की खात्री असेल.  तो विशाल समुद्र तिला पूर्णपणे सामावून घेईल.  देवाच्या दयेचेही तसेच आहे.  ती अपार आणि असीम आहे.  म्हणून, जर तुम्ही विश्वास ठेवला तर…

चिंतन 94: त्या दुष्टाचा सामना

त्या दुष्टाचा तीव्र द्वेष टाळायचा असेल, तर पवित्रतेसाठी प्रयत्न करू नका.  सैतान तरीही तुमचा द्वेष करेल, पण तो एखाद्या संताचा करतो तितका तुमचा द्वेष करणार नाही.  पण अर्थातच, हा तर मूर्खपणा आहे!  द्वेष टाळण्यासाठी कोणी पवित्रतेपासून दूर का राहावे…

चिंतन 84: पवित्र ख्रिस्तप्रसाद

परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तावर आपण कितीही गाढ प्रेम केले आणि कितीही भक्तिभावाने त्याची आराधना केली, तरी ते पुरेसे ठरणार नाही. परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तासमोर आपण असतो, तेव्हा त्या रूपाआड खरोखर उपस्थित असलेला सर्वशक्तिमान देव आपल्याला दिसला पाहिजे. तोच दया, शाश्वत जीवन, सनातन…

चिंतन ८२: आसक्ती

जीवनात अनेक गोष्टींची आपल्याला आसक्ती जडू शकते. कधीकधी चांगल्या गोष्टींचीही आपल्याला आसक्ती जडते. बहुतेकदा मात्र आपण स्वतःच्या हट्टी इच्छेलाच चिकटून राहतो. आपल्याला जे हवे असते, ते हवे तेव्हाच मिळावे, असा आपला आग्रह असतो. खऱ्या…

चिंतन 81: सामर्थ्य आणि दया

एखाद्या देशाच्या हुकूमशहाची कल्पना करा. त्याच्या हातात अमर्याद सत्ता आहे आणि तो अतिशय संतापी, दुष्ट व सूडबुद्धीचा आहे. अशा माणसाचा रोष ओढवून घ्यायला तुम्हाला आवडणार नाही. आता याच्या अगदी उलट कल्पना करा. ज्याच्याकडे अमर्याद सत्ता आहे आणि ज्याच्या हृदयात निखळ…

चिंतन 77: प्रभूला सर्व काही माहीत आहे

आपल्या दैवी प्रभूला सर्व काही माहीत आहे, यात शंका नाही.  आपल्या मनातला प्रत्येक विचार आणि आपली प्रत्येक गरज तो जाणतो, याची व्याप्ती आपल्याला कधीही पूर्णपणे समजणार नाही.  त्याच्या परिपूर्ण ज्ञानाची जाणीव होऊ लागते तेव्हा कधीकधी आपण अशी अपेक्षा करतो की तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करील, जरी आपण…

चिंतन 69: अडचणींमुळे शंका घेण्याचा मोह होतो

आपल्या सर्वांनाच जीवनात अडचणी येतात.  प्रश्न असा आहे: “तुम्ही त्यांना कसे सामोरे जाता?”  अडचणी आल्या की देव खरोखर आपल्या सोबत आहे का, तो दयेने आपल्याला मदत करील का, अशी शंका घेण्याचा मोह आपल्याला कितीतरी वेळा होतो.  पण प्रत्यक्षात याच्या उलटच खरे आहे.  प्रत्येक अडचणीचे उत्तर देवच आहे.  तो…

चिंतन 41: भावना विरुद्ध श्रद्धा

कधी कधी सत्याने आपल्याला फारसा दिलासा मिळत नाही असे वाटते. हे ऐकायला विचित्र वाटेल. पण प्रामाणिकपणे पाहिले तर, आपल्याला जे वाटते ते खरे नाही हे माहीत असूनही कधी कधी आपण मनातून दुःख सोसतो. उदाहरणार्थ, देव आपल्या सोबत आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो, याची आपल्याला खात्री असू शकते; पण…