मराठी

चिंतन 224: बोलावे की मौन राहावे?

गरजेपेक्षा जास्त बोलणे आणि इतरांना आपली बाजू समजावून सांगणे ही आपली एक सामान्य मानवी प्रवृत्ती आहे. विशेषतः आपले वागणे योग्य होते, हे त्यांना पटवून देण्याचा आपण प्रयत्न करतो. इतरांचा आपल्याबद्दल गैरसमज झाला आहे, असे वाटते तेव्हा ही प्रवृत्ती विशेष जाणवते. पण येशूला अशा गैरसमजाचा अगदी टोकाचा अनुभव आला…

पुढे वाचा

चिंतन 223: एक भयावह दिवस

जीवनात कोणतीही गोष्ट भयावह असलीच पाहिजे असे नाही. आपण सोसत असलेला कितीही मोठा संघर्ष आणि दुःख देव सहजपणे आपल्या दयेचे आणि आपल्या पवित्रीकरणाचे साधन बनवू शकतो…

पुढे वाचा

चिंतन 222: ओझ्याने दबून गेल्यासारखे वाटणे

काही दिवस असे येतात की कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला ओझ्याने दबून गेल्यासारखे वाटते. कदाचित तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील आणि आपली कर्तव्ये नीट पार पाडता येतील की नाही, याची तुम्हाला चिंता वाटत असेल…

पुढे वाचा

चिंतन 221: स्वतःचाच गौरव करणे

कधीकधी, जे स्वतः फार “धार्मिक” असतात, ते अनेक “धार्मिक” विषयांवर बोलतात. त्यांच्या बोलण्यात भक्तिभाव असतो आणि ते पवित्र गोष्टींविषयी बोलतात. पण शेवटी, लोकांच्या नजरेत स्वतःचा गौरव व्हावा, हाच त्यांच्या सगळ्या बोलण्याचा आणि वागण्याचा खरा हेतू असू शकतो. हाच तो संघर्ष…

पुढे वाचा

चिंतन 220: व्याकूळ आत्मा

काही जणांना आपल्या आत्म्याच्या गाभ्यात तीव्र यातना जाणवतात. कधी या यातना पापामुळे होतात, तर कधी देवाच्या एका विशेष दयेमुळे आत्म्याला येशूने सोसलेल्या यातनांचा अनुभव घेता येतो. कारण काहीही असो, जर तुम्हाला…

पुढे वाचा

चिंतन 219: देवाच्या दयेची घोषणा करताना येणाऱ्या अडचणी

आपल्या जीवनात देवाच्या दयेचा पूर्णपणे स्वीकार करण्याचा निश्चय केलात, तर तुमच्यात असा बदल घडेल की त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण तुम्हाला आणखी एक अनुभवही येईल. देवाच्या दयेनुसार जगण्याचा आणि पापात पडलेल्या जगाला त्या दयेची घोषणा करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. जगाला देवाची दया समजत नाही. कठोरपणे वागणे आणि इतरांना दोष देणे एवढेच जगाला माहीत आहे. जग सूड घेण्याच्या मागे असते आणि गौरव करते…

पुढे वाचा

चिंतन 218: देवाची एक अनुभूती

देवाला आणि त्याच्या मार्गांना समजून घेणे महत्त्वाचे आहे; पण समजून घेणे आणि ओळखणे या एकच गोष्टी नाहीत. देवाला ओळखणे म्हणजे एका व्यक्तीशी भेट होणे. ती व्यक्ती काय सांगते ते समजून घेण्यापुरते आपण थांबत नाही; तर आपण तिच्याशी संवाद साधतो, तिला भेटतो, तिचा अनुभव घेतो आणि तिच्याशी नाते जोडतो. खरे तर…

पुढे वाचा

चिंतन 217: आळशी आणि निष्क्रिय आत्मा

देवाच्या गोष्टींबाबत आपण आपल्या आत्म्याला आळशी आणि निष्क्रिय होऊ देतो, तेव्हा आपण सैतानाला संतुष्ट करतो. निष्क्रिय आत्मा देवाच्या जीवनात सहभागी होण्याचा प्रयत्न करत नाही. असा आत्मा आध्यात्मिक बाबतीत सक्रिय असण्याऐवजी निष्क्रिय असतो. ‘निष्क्रिय’ असण्याचा अर्थ असा की ती व्यक्ती…

पुढे वाचा

चिंतन 216: खऱ्या प्रेमाने मनाला येणारी स्पष्टता

आपली चर्च आपल्याला अशा अनेक गोष्टी शिकवते, ज्या केवळ देवाच्या कृपेनेच समजू शकतात. यांपैकी काही शिकवणी नीतिमत्तेविषयी आहेत; त्या आपल्याला सद्गुणांनी परिपूर्ण जीवन जगण्याचे आवाहन करतात. काही शिकवणी देवाविषयी, म्हणजे त्याच्या अस्तित्वाविषयी आणि त्याच्या मूळ स्वरूपाविषयी आहेत. काही शिकवणी मानवजातीविषयी आहेत; त्यांतून आपण कोण आहोत, हे…

पुढे वाचा

चिंतन 215: निवडीचे स्वातंत्र्य

एका अर्थाने असे म्हणता येईल की, संपूर्ण अंतःकरणाने त्याच्याकडे वळण्याचे आणि त्याची दया स्वीकारण्याचे बंधन देव आपल्यावर घालतो. त्याची दया इतरांपर्यंत पोहोचवण्याचे बंधनही तो आपल्यावर घालतो. पण हे काही सर्वसाधारण ‘बंधन’ नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. हे एक बंधन आहे…

पुढे वाचा