मराठी

चिंतन 124: मध्यस्थीच्या प्रार्थनेतून लाभणारी दया

देवाची दैवी दया जगावर भरभरून बरसावी, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाला तुम्ही सहजपणे ‘हो’ म्हणाल, अशी आशा आहे आणि बहुधा तसेच असेल. हे घडेल की नाही, याची काही अंशी जबाबदारी तुमच्यावरही आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः, येशूने…

पुढे वाचा

चिंतन 123: अपमानातून मिळणारा आशीर्वाद

शुद्धीवर असलेल्या कोणाला स्वतःचा अपमान व्हावा असे वाटेल? तुमचा अपमान झाला तर तुम्ही काय कराल? अपमान टाळण्याचे मार्ग शोधण्याचा मोह बहुतेकांना होईल. काही जण त्यामुळे मनातून फार दुखावतील. तर काही जण रागावून स्वतःची बाजू सावरू लागतील. आणि जरी…

पुढे वाचा

चिंतन 122: निवड तुमच्या हातात असती तर

जगातील सर्व संपत्ती किंवा येशूशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे नाते, यांपैकी एक निवडायचे झाले, तर तुम्ही काय निवडाल? उत्तर देण्याची घाई करू नका. येशूला निवडणे हेच योग्य उत्तर आहे, हे कदाचित आपल्याला माहीत असेल; पण तुम्ही खरोखर त्याला निवडाल का? तुम्हाला लाभणाऱ्या सामर्थ्याची आणि सांसारिक “स्वातंत्र्याची” कल्पना करा…

पुढे वाचा

चिंतन 121: तुमच्या हृदयाच्या अंतरंगातील गुप्त बाग

कल्पना करा की तुमच्या घराच्या आत एक असे अंगण आहे जे कुणाच्या नजरेस पडत नाही, आणि त्या अंगणात तुमची एक बाग आहे. या गुप्त बागेबद्दल कुणालाही माहीत नव्हते. तिथे तुम्ही माती खणून भुसभुशीत करत होता, लागवड करत होता, कष्ट उपसत होता, तण काढत होता आणि पीक गोळा करत होता. या बागेचे उत्पन्न मग गुपचूप वाटले जात असे…

पुढे वाचा

चिंतन 120: देवावरील निर्मळ प्रेम

प्रेम हे तुमच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. अधिक नेमके सांगायचे तर, सर्वप्रथम देवावर निर्मळ प्रेम करणे हे तुमचे ध्येय आहे. प्रेम निर्मळ होण्यासाठी ते सर्व स्वार्थापासून मुक्त असले पाहिजे. निर्मळ प्रेमात आपले लक्ष केवळ ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यावर असते. जेव्हा आपण देवावर निर्मळ प्रेम करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण…

पुढे वाचा

चिंतन 119: आंतरिक आणि बाह्य आत्मत्याग

आत्मत्याग म्हणजे स्वतःच्या इच्छेला मुरड घालण्याचा सराव, जेणेकरून या जगातील क्षणभंगुर गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होत जाईल.  देव आणि त्याची पवित्र इच्छा यांव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींच्या आसक्तीतून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.  आपल्याला आवडते किंवा हवेसे वाटते ते सर्वच वाईट असते असे नाही. पण आपल्याला खरे पावित्र्य हवे असेल, तर आपली…

पुढे वाचा

चिंतन 118: हट्टी हृदय

आपल्या जीवनात देवाच्या दयेला आपण ज्या मुख्य कारणांमुळे शिरू देत नाही, त्यांपैकी एक म्हणजे हट्टीपणा. विशेषतः, जेव्हा आपण अहंकारामुळे स्वतःच्या मताला हट्टाने चिकटून राहतो आणि त्यामुळे सत्य स्वीकारण्यास तयार नसतो, तेव्हा आपण कृपेसाठी दार बंद करतो. हे…

पुढे वाचा

चिंतन 117: तुमच्या हृदयाचा बंदिस्त परिसर

काही धर्मभगिनी आणि धर्मबंधू मठाच्या बंदिस्त परिसरात एकांतवासात राहतात. त्या श्रद्धावान समुदायाच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही योग्य कारणाशिवाय त्या परिसरात प्रवेश मिळत नाही. इतरांना मठप्रमुखांच्या परवानगीनेच आत जाता येते. असेही असू शकते की…

पुढे वाचा

चिंतन 116: देव आपल्यावर अवलंबून असतो

देव पूर्णपणे स्वतंत्र आहे, कारण तो स्वतःचे अस्तित्व स्वतःच टिकवतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यात परिपूर्ण ऐक्य आहे. या ऐक्यात ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. हे परस्परावलंबन त्यांना पुरेसे आहे. तरीही, पवित्र त्रित्वाने स्वतःच्या इच्छेने अवलंबून राहण्याचे निवडले…

पुढे वाचा

चिंतन 115: देवाची इच्छा तुम्हाला सुरक्षित ठेवील

देवाची इच्छा म्हणजे केवळ त्याने तुमच्या भविष्यासाठी आखलेली योजना नव्हे. तुमच्यासाठी त्याच्या ज्या आशा आणि स्वप्ने आहेत, त्यांपलीकडेही त्याच्या इच्छेचा अर्थ आहे. त्याची इच्छा हा तुमच्या पावित्र्याचा मार्ग आहे आणि तीच सर्वांत मोठ्या सांत्वनाचा व आनंदाचा झरा आहे. त्याची इच्छा सक्रिय आणि निष्क्रिय (अनुमती देणारी) अशा दोन्ही प्रकारे कार्य करते. ती…

पुढे वाचा