मराठी

चिंतन 54: इतरांसाठी प्रार्थना

आपल्या ओळखीतील प्रत्येक जण स्वर्गात जाईल, असे गृहीत धरणे सोपे आहे.  अर्थात, आपण अशी आशा बाळगली पाहिजे.  पण स्वर्गप्राप्तीसाठी अंतःकरणात खरे परिवर्तन घडले पाहिजे.  स्वर्गात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती आपले जीवन ख्रिस्ताला अर्पण करण्याचा आणि पापापासून दूर वळण्याचा वैयक्तिक निर्णय घेतल्यामुळेच तिथे पोहोचते.  कशी…

पुढे वाचा

चिंतन 53: प्रार्थनेतील अडचणी

रोज प्रार्थना करण्याची सवय लावताना आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी येतात.  अंतर्गत अडचणी: निरुत्साह, प्रार्थनेत जाणवणारा कोरडेपणा, मनाचा जडपणा आणि मोह.  संयमाने आणि चिकाटीने या अडचणींवर मात करता येते.  बाह्य अडचणी…

पुढे वाचा

चिंतन 52: दररोजची प्रार्थना

तुमच्या आत्म्याला सुंदर काय बनवते?  प्रार्थना.  तुम्हाला पापापासून दूर काय ठेवते?  प्रार्थना.  तुमचे मन आशेने काय भरून टाकते?  प्रार्थना.  पवित्रतेच्या मार्गावर तुम्हाला पुढे काय नेते?  प्रार्थना.  प्रार्थना ही सर्व गोष्टींची गुरुकिल्ली आहे.  प्रार्थनेशिवाय प्रत्येक दिवशी…

पुढे वाचा

चिंतन 51: शुद्ध प्रेम

तुमचे प्रेम शुद्ध आहे का?  असे प्रेम कसे असते?  शुद्ध प्रेम थेट ख्रिस्ताच्या हृदयातून तुमच्या जीवनात येते आणि तुमच्या जीवनातून इतरांपर्यंत वाहते.  या पवित्र प्रेमाची काही सुंदर वैशिष्ट्ये आहेत.  पहिले म्हणजे, ते विपुल असते.  जेव्हा आपण ख्रिस्ताच्या हृदयाने प्रेम करतो, तेव्हा आपण भरभरून प्रेम करतो.  आपण…

पुढे वाचा

चिंतन 50: देवाचा स्वर ऐकणे

देव दिवसभर तुमच्याशी बोलत असतो, हे खरे आहे. तो तुम्हाला सतत त्याचे सत्य सांगत असतो, तुमच्या जीवनाला दिशा देत असतो आणि तुमच्यावर त्याची दया करत असतो. अडचण अशी की त्याचा स्वर अतिशय सौम्य आणि शांत असतो. का? कारण तुम्ही आपले संपूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यावे, अशी त्याची इच्छा आहे. तो…

पुढे वाचा

चिंतन 49: आपल्याविषयी होणारे गैरसमज

संत होण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. त्या मार्गाने आपण चालू लागलो, तर वीरत्वाने सद्गुण आचरणात आणण्याचे आवाहनही आपल्याला केले जाईल. असे आचरण इतरांना नेहमीच समजेल असे नाही. खरे तर, जगाच्या शहाणपणाच्या दृष्टीने सद्गुणांचे असे वीरत्वपूर्ण आणि पवित्र आचरण म्हणजे मूर्खपणा. पण आपण…

पुढे वाचा

चिंतन 48: मौन

आपल्या बोलण्याने आपण इतरांना उभारी देऊ शकतो किंवा त्यांचे खच्चीकरण करू शकतो. आपल्या बोलण्याचा थेट परिणाम आपल्या स्वतःच्या आत्म्यावरही होतो. देवाच्या प्रेरणेने आपण बोलतो तेव्हा आपण पवित्रतेत वाढतो. पण देवाकडून न आलेले शब्द आपण बोलतो तेव्हा आपण स्वतःच्या आत्म्याची आणि इतरांची मोठी हानी करतो. ध्येय…

पुढे वाचा

चिंतन 47: इतरांच्या गरजा ओळखणे

अनेकदा आपण स्वतःमध्ये आणि स्वतःच्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपल्या सभोवतालच्या लोकांच्या, विशेषतः आपल्या कुटुंबीयांच्या, अडचणी आणि गरजा आपल्या लक्षात येत नाहीत.  कधीकधी…

पुढे वाचा

चिंतन 46: दैनंदिन कर्तव्ये हाच स्वर्गाचा मार्ग

स्वर्ग हेच आपले ध्येय असले पाहिजे, हे खरे आहे. या शाश्वत वास्तवावर आपण सतत आपली नजर ठेवली पाहिजे. का? कारण या क्षणभंगुर जगाच्या तुलनेत शेवटी स्वर्गालाच महत्त्व आहे. मग आपल्या दैनंदिन कर्तव्यांविषयी बेफिकीर न होता स्वर्गावर आपले लक्ष कसे केंद्रित ठेवायचे…

पुढे वाचा

चिंतन 45: पवित्र परमप्रसाद

कधीकधी आपल्याला मिस्साला जावेसे वाटत नाही, किंवा परमपवित्र संस्कार ग्रहण करण्यासाठी पुढे जाताना आपले मन फार विचलित झालेले असते. अशा वेळी पवित्र आज्ञाधारकतेने वागणे हा कदाचित सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. दर रविवारी आणि प्रत्येक पवित्र सणाच्या दिवशी तुम्ही पवित्र परमप्रसाद ग्रहण करावा, अशी येशूची इच्छा आहे…

पुढे वाचा