मराठी

चिंतन 64: देवाचा आवाज ऐकणे

तुम्ही चर्चमध्ये असता तेव्हा लक्ष देऊन ऐकता का? विशेषतः, तुम्ही देवाचा आवाज ऐकता का? अनेकदा आपण प्रवचन ऐकायला बसतो, पण आपले मन भरकटते आणि प्रवचनात सांगितलेले सगळेच किंवा त्यातले बरेचसे आपल्या कानावरून जाते. तुमचे मन कुठे भरकटते? खरे तर, कधीकधी मनाचे असे भरकटणे…

पुढे वाचा

चिंतन 63: तुम्ही इतरांशी कसे बोलता?

इतरांशी बोलताना आपल्या ओठांतून देवाचे प्रेम आणि दया झळकली पाहिजे. पण हे कसे साधेल? आपले बोलणे कसे असावे? आपण देवाशी कसे बोलावे, हे लक्षात घेऊन इतरांशी बोलण्याची आपली रीत तपासता येईल. देवाशी बोलताना आपण प्रामाणिकपणे बोलले पाहिजे…

पुढे वाचा

चिंतन ६२: जीवनातील छोटे त्याग

छोट्या त्यागांना महत्त्व आहे का? कधी कधी आपल्याला वाटते की आपण मोठी कामे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही जणांच्या मनात मोठमोठ्या कल्पना असतात आणि काहीतरी भव्य साध्य करण्याची स्वप्ने ते पाहतात. पण रोजच्या एकसुरी जीवनात आपण जे छोटे छोटे त्याग करतो, त्यांचे काय? उदाहरणार्थ, साफसफाई करणे…

पुढे वाचा

चिंतन ६१: आनंद कुठून मिळतो?

तुरुंगात असतानाही तुम्ही आनंदी राहू शकाल का? किंवा अगदी तरुण वयात एकांतवासी मठात प्रवेश करून आयुष्यभर एकांतात राहण्याचे तुम्हाला पाचारण मिळाले तर? अत्यंत गरिबीत, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यापुरतेही जेमतेम मिळत असताना तुम्हाला आनंद लाभू शकेल का…

पुढे वाचा

चिंतन ६०: आध्यात्मिक कोरडेपणाला सामोरे जाताना

कधी कधी आपल्या आत्म्याला आध्यात्मिक कोरडेपणा जाणवतो का? आपल्या दैनंदिन जीवनात अधिक आध्यात्मिक सांत्वन मिळावे असे वाटते का? असा संघर्ष अनेकांना अनुभवावा लागतो; त्याची काळजी करण्याची गरज नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे मुख्य ध्येय आहे. अनेकदा…

पुढे वाचा

चिंतन 59: “हे रक्त आणि पाणी…”

येशूच्या मृत्यूनंतर एक सैनिक त्याच्याजवळ आला. येशू खरोखर मरण पावला आहे याची खात्री करून घेण्याची आज्ञा त्या सैनिकाला देण्यात आली होती. म्हणून त्याने येशूच्या अनमोल देहाला भाल्याने भेदले आणि त्याच्या जखमी हृदयातून लगेच रक्त आणि पाणी उसळून बाहेर आले. या घटनेवर प्रार्थनापूर्वक चिंतन केले गेले आहे…

पुढे वाचा

चिंतन 58: पापापासून शुद्धीकरण

पापाचा विषय अनेक जण टाळतात.  आपल्या पापांचा विचार करायला आपल्याला आवडत नाही.  ती कबूल करायलाही आपल्याला आवडत नाही. अनेकदा आपण स्वतःच्या वागण्याचे समर्थन करतो, जणू आपल्या हातून काही पाप घडलेच नाही.  या ना त्या ‘पापा’साठी आपल्याला सहज सबबी सुचतात.  पण पापाकडे पाहण्याचा आणखी एक दृष्टिकोन आहे.  आपण…

पुढे वाचा

चिंतन 57: तुमच्या आत्म्यातील अग्नी

एखाद्या व्यक्तीचे आंतरिक प्रार्थनाजीवन किती गहिरे आहे, हे ओळखता येते का? हे जीवन ‘आंतरिक’ आहे आणि ते एक आध्यात्मिक वास्तव आहे, तरीही ते बाहेरून जाणवू शकते का? नक्कीच. खरे तर, एखाद्या व्यक्तीचे प्रार्थनाजीवन जितके गहिरे असेल, तितके तिचे अंतर्जीवन अधिक तेजाने झळकते आणि ते इतरांनाही दिसते…

पुढे वाचा

चिंतन 56: आजची सुवार्ता

लौकिक जग वाईट बातम्यांनी भरलेले आहे. आपले लक्ष टिकवून ठेवण्यासाठी वृत्तपत्रे, चर्चात्मक कार्यक्रम आणि इतर प्रसारमाध्यमे दुःखद घटनांना सनसनाटी रूप देऊन त्या अतिरंजितपणे मांडतात आणि त्यावरच भरभराट करतात. आपणही नवी कुजबुज किंवा टीका इतरांना सांगायला अनेकदा उत्सुक असतो. पण चांगल्या बातमीचे काय…

पुढे वाचा

चिंतन 55: सृष्टीत देवाच्या दयेचे प्रतिबिंब दिसते

कल्पना करता येईल अशा सर्वांत सुंदर सूर्यास्ताचा विचार करा. संध्याकाळी अथांग समुद्रावर सूर्यास्ताची झळाळी पसरली आहे आणि आकाश रंगांनी उजळून निघाले आहे.  किंवा निरभ्र निळ्या आकाशाला भेदून जाणाऱ्या भव्य पर्वतशिखरांचा विचार करा, अथवा उंचावरून प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याचा.  या साऱ्या देणग्या…

पुढे वाचा