मराठी

चिंतन 322: गर्वाचा अडथळा

प्रभू आपल्या अपार दयेने रात्रंदिवस तुमच्याकडे येतो, आणि तुमचा आत्मा त्याच्यासाठी खुला असतो तेव्हा तो आनंदाने त्यात प्रवेश करतो.  कितीही मोठे संघर्ष असले तरी आपला प्रभू तुमच्याकडे येण्याचे थांबवत नाही.  पण एक गोष्ट मात्र आपल्या प्रभूला तुमच्यापासून दूर ठेवते.  ती म्हणजे गर्व.  गर्व हा सर्व पापांची जननी आहे…

चिंतन 311: नम्रतेचे सत्य

नम्रता हा तेजस्वी सद्गुण समजून घेतला पाहिजे, त्यावर सतत चिंतन केले पाहिजे आणि तो सतत अंगीकारला पाहिजे. नम्रता म्हणजे काय? स्वतःविषयीचे सत्य जाणणे, ते सत्य मान्य करणे आणि त्यानुसार जगणे, एवढेच. तुमच्या सदसद्विवेकबुद्धीचा ठाव फक्त तुम्हाला आणि देवाला आहे. लोकांचे…

चिंतन 293: स्वतःच्या नजरेत शून्य होणे

स्वतःच्या नजरेत आपण काहीच नाही, हे उमगण्यात तुम्हाला काही मोल वाटते का? कदाचित नाही. हे शब्द स्वीकारणे कठीण जाते, कारण देवाच्या कृपेच्या विशेष दानानेच नम्रतेचा पूर्ण अर्थ उमगतो. काही प्राचीन तत्त्वज्ञ तर गर्वालाच मोठा सद्गुण मानतात आणि नम्रतेला…

चिंतन 287: अपमानाचे वस्त्र

‘अपमान’ या शब्दातून चारचौघांत झालेली नाचक्की, बदनामी, मानहानी आणि ओशाळवाणेपणा असे अर्थ व्यक्त होऊ शकतात. पण येशूच्या बाबतीत या शब्दाला एक विशेष अर्थ आहे. ‘अपमानाचे वस्त्र’ म्हणजे क्रूसामुळे येशूला लोकांसमोर जो अपमान सहन करावा लागला तो. त्याला पापी आणि खोटारडा ठरवून दोषी ठरवण्यात आले. लोकांची दिशाभूल केल्याचा आणि नागरी सत्ताधाऱ्यांचा अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. तो लक्ष्य ठरला…

चिंतन 259: नम्र आत्म्याचे सौंदर्य

एखाद्या व्यक्तीला खरे सौंदर्य कशामुळे लाभते? इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा नम्रतेच्या सद्गुणामुळे. नम्रतेत विलक्षण आकर्षण असते. सुरुवातीला काहींवर नम्र व्यक्तीची फारशी छाप पडत नाही; पण कालांतराने नम्रता अगदी गर्विष्ठ आणि आत्मकेंद्रित व्यक्तीलाही आपल्याकडे ओढून घेते. हे…

चिंतन 241: आपल्या विशिष्ट पापांवर उपाय

तुम्ही आपल्या पापांवर मात कशी कराल?  प्रत्येक पाप वेगळे असते आणि त्याची आसक्ती सुटावी म्हणून त्यासाठी विशिष्ट प्रार्थना व त्याग आवश्यक असतात.  देहवासनेची, क्रोधाची आणि गर्वाची पापे ही तीन सामान्य प्रकारची पापे आहेत.  यांपैकी प्रत्येक पापावर मात करता येते, पण त्यासाठी विशेष…

चिंतन 221: स्वतःचाच गौरव करणे

कधीकधी, जे स्वतः फार “धार्मिक” असतात, ते अनेक “धार्मिक” विषयांवर बोलतात. त्यांच्या बोलण्यात भक्तिभाव असतो आणि ते पवित्र गोष्टींविषयी बोलतात. पण शेवटी, लोकांच्या नजरेत स्वतःचा गौरव व्हावा, हाच त्यांच्या सगळ्या बोलण्याचा आणि वागण्याचा खरा हेतू असू शकतो. हाच तो संघर्ष…

चिंतन 219: देवाच्या दयेची घोषणा करताना येणाऱ्या अडचणी

आपल्या जीवनात देवाच्या दयेचा पूर्णपणे स्वीकार करण्याचा निश्चय केलात, तर तुमच्यात असा बदल घडेल की त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण तुम्हाला आणखी एक अनुभवही येईल. देवाच्या दयेनुसार जगण्याचा आणि पापात पडलेल्या जगाला त्या दयेची घोषणा करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. जगाला देवाची दया समजत नाही. कठोरपणे वागणे आणि इतरांना दोष देणे एवढेच जगाला माहीत आहे. जग सूड घेण्याच्या मागे असते आणि गौरव करते…

चिंतन 206: आध्यात्मिक साठेबाजी

आध्यात्मिक जीवनाला असलेल्या एका खऱ्या धोक्याला ‘आध्यात्मिक साठेबाजी’ असे म्हणता येईल. ही वृत्ती अशा व्यक्तीत दिसते, जी देवाच्या दयेचे साधन होण्याऐवजी ती दया स्वतःपुरतीच ठेवू पाहते. देवाची दया स्वतःपुरतीच ठेवण्याचा प्रयत्न करताना माणूस…

चिंतन 182: गर्वाची गुपिते उलगडण्याचे शहाणपण

गर्व आपल्याला पूर्णपणे ग्रासू शकतो.  असे झाले की आपल्याला फक्त स्वतःचाच आणि स्वतःच्या वेदनेचाच विचार सुचतो.  कदाचित तुम्हालाही असा अनुभव आला असेल.  कदाचित तुमचे मन दुखावले गेले असेल आणि तुम्ही त्या जखमेचा विचार करत खिन्न होऊन बसत असाल.  त्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होते आणि ती जखम भरून यावी म्हणून तुम्ही प्रयत्न करता.  पण…