मराठी

चिंतन 303: मौन

आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात अनेकांना भेडसावणारा एक धोका म्हणजे सततचा गोंगाट. दिवसभर आपल्या कानांवर बोलण्याचा भडिमार होत राहतो. कधी रेडिओ, टीव्ही किंवा इंटरनेटवरून, तर कधी कुणाच्या अखंड बोलण्यातून. अगदी गाढ शांततेचे क्षण आपल्याला क्वचितच…

चिंतन 279: तुमच्या अंतःकरणातील खात्री

तुमच्या आत्म्यात उमटणाऱ्या अंतरीच्या खात्रीतून देव तुमच्याशी काय बोलतो, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. कधी देवाचा आवाज ठळक आणि स्पष्ट वाटेल, तर कधी तो क्षीण आणि संभ्रमात टाकणारा वाटेल. अनेक गोष्टींमुळे देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ शकते…

चिंतन 184: पुरोहितांच्या सेवाकार्यातून लाभणारी दया

नाही, पुरोहित परिपूर्ण नाहीत.  त्यांच्याकडूनही दिवसेंदिवस पापे घडतात.  इतर सर्व माणसांप्रमाणेच त्यांनाही दैनंदिन जीवनात सतत पश्चात्ताप करण्याची आणि देवाकडे वळण्याची गरज असते.  तरीही ते पुरोहित आहेत.  आणि त्यांच्या पवित्र पुरोहिताभिषेकामुळे प्रभू त्यांच्याद्वारे स्पष्टपणे बोलतो, तरी…

चिंतन 180: येशूचे दुःखसहन

शुभवर्तमानांशी परिचित असलेले आपणही कधीकधी ख्रिस्ताच्या दुःखसहनाविषयी काहीसे उदासीन होऊ शकतो. दरवर्षी आपण हे वृत्तांतवाचन ऐकतो आणि ख्रिस्ताच्या दुःखसहनाची अनेक चित्रेही आपण पाहिली आहेत. या सवयीमुळे त्याचा आपल्यावर व्हायला हवा तसा परिणाम होऊ दिला जात नाही…

चिंतन 177: पवित्र आज्ञापालन

देवाच्या इच्छेऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यापासून आपल्याला जपणाऱ्या सर्वांत प्रभावी साधनांपैकी एक म्हणजे पवित्र आज्ञापालन. व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून आज्ञापालन करण्याचे वरदान लाभते. ही बाह्य आचरणाची सवय ते अंतःकरणात रुजवू शकतात, जेणेकरून त्यांना खात्री होईल की ते जगत आहेत…

चिंतन 157: नैतिक निर्णय कसे घ्यावेत?

नैतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे तुम्हाला कधी कठीण जाते का? आपल्या पतित मानवी स्वभावामुळे असे घडते. जीवनात आपण सहज गोंधळून जातो आणि देवाच्या मनात काय आहे व त्याची इच्छा काय आहे, हे आपल्याला समजेलच असे नाही. मग तुम्ही काय करावे? तुमची सदसद्विवेकबुद्धी हे एक पवित्र स्थान आहे, जिथे…

चिंतन 149: अंतःकरणातील प्रेरणा

गरजूंपर्यंत देवाची दया पोहोचवण्याच्या असंख्य संधी आपल्या सभोवती आहेत. पण या संधी आपल्या नकळत सहज निसटून जातात. दैवी दयेचे साधन बनण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करणे…

चिंतन १०८: ख्रिस्तसभेचा आवाज

देव संतांशी अनेक प्रकारे बोलला आहे. त्याने त्यांच्या अंतःकरणात दिलेल्या अनेक कृपादानांद्वारे आणि प्रेरणांद्वारेही तो त्यांच्याशी बोलला आहे. पण पवित्रतेचे सर्वोच्च शिखर गाठलेल्या गूढानुभवी व्यक्तीलाही अखेरीस देवाचा जो आवाज त्याच्या ख्रिस्तसभेद्वारे ऐकू येतो, त्यापुढे नम्रपणे मान तुकवावी लागते. ख्रिस्तसभा, विशेषतः…

चिंतन 101: इतरांच्या माध्यमातून देव बोलतो

तुम्हाला जो एखादा विशिष्ट संदेश ऐकण्याची गरज असते, तो देव अनेकदा तुम्हाला सांगू इच्छितो. मिस्सातील प्रवचन ऐकताना, एखादे पुस्तक वाचताना, रेडिओवर काही ऐकताना किंवा एखाद्या मित्राशी बोलताना एखादी गोष्ट खास तुमच्या लक्षात भरू शकते, पण तिचा परिणाम झालेला दिसत नाही…

चिंतन 50: देवाचा स्वर ऐकणे

देव दिवसभर तुमच्याशी बोलत असतो, हे खरे आहे. तो तुम्हाला सतत त्याचे सत्य सांगत असतो, तुमच्या जीवनाला दिशा देत असतो आणि तुमच्यावर त्याची दया करत असतो. अडचण अशी की त्याचा स्वर अतिशय सौम्य आणि शांत असतो. का? कारण तुम्ही आपले संपूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यावे, अशी त्याची इच्छा आहे. तो…