मराठी

चिंतन 318: उदासीनता आणि विसरभोळेपणा

समजा, तुमचे लग्न झाले आहे आणि तुम्ही आपल्या जोडीदाराबद्दल अनेकदा उदासीन राहता. ही एक समस्या ठरेल. उदासीनता म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याची मनापासून काळजी न घेणे. विसरभोळेपणा हे उदासीनतेचे एक लक्षण आहे, कारण एखाद्या गोष्टीची फारशी काळजी नसली की तिचा सहज विसर पडतो. उदाहरणार्थ…

चिंतन 298: निरर्थक कुजबुजीचा विषाणू

आपल्या पतित मानवी स्वभावातील एक दुर्दैवी प्रवृत्ती म्हणजे इतरांविषयी ‘कुजबुज’ करणे. ही कुजबुज विषाणूसारखी आहे: एकाने सुरुवात केली की ती झपाट्याने इतरांपर्यंत पसरते. आपल्या लक्षात येण्याआधीच अनेक जण खोट्या अफवा आणि वावड्या पसरवू लागतात, किंवा खऱ्या गोष्टीही प्रेमभाव न ठेवता सांगू लागतात. हे…

चिंतन 296: आई-वडिलांचे प्रेम

आपल्या लेकरावर उत्कट प्रेम करणाऱ्या आईची किंवा वडिलांची कल्पना करा. लेकराची काळजी घेण्यात आणि त्याचे भले जपण्यात ते स्वतःला पूर्णपणे वाहून घेतात. लेकराच्या जन्मापासून ते मोठे झाल्यावरही त्यांचे प्रेम अढळ असते; ते आपले प्रेम कधीही मागे घेत नाहीत. आता कल्पना करा, एखाद्या दिवशी ते लेकरू त्यांना सोडून निघून गेले तर त्यांच्या हृदयाला किती वेदना होतील…

चिंतन 284: वर्तमान क्षणात जगणे

भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमून वर्तमान क्षणात न जगण्याचा मोह अनेकांना होतो. भूतकाळातील घटना, पापे, मनाच्या जखमा आणि अशा इतर गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही राहता, तेव्हा तुम्ही भूतकाळात जगता. भूतकाळातील…

चिंतन 199: येशूशी ऐक्य म्हणजे इतरांशी ऐक्य

अनेक कारणांनी चर्च गौरवशाली आहे. तिच्यात आढळणारे ऐक्य हे तिच्या गौरवाचे एक अंग आहे. कधीकधी तिच्यात पुष्कळ फूट पडते, अनेकांना दुखापत होते आणि नानाविध प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो, हे खरे आहे. पण हे चर्चचे गुणधर्म नाहीत. हे पापांचे परिणाम आहेत…

चिंतन 182: गर्वाची गुपिते उलगडण्याचे शहाणपण

गर्व आपल्याला पूर्णपणे ग्रासू शकतो.  असे झाले की आपल्याला फक्त स्वतःचाच आणि स्वतःच्या वेदनेचाच विचार सुचतो.  कदाचित तुम्हालाही असा अनुभव आला असेल.  कदाचित तुमचे मन दुखावले गेले असेल आणि तुम्ही त्या जखमेचा विचार करत खिन्न होऊन बसत असाल.  त्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होते आणि ती जखम भरून यावी म्हणून तुम्ही प्रयत्न करता.  पण…

चिंतन 109: देवाची कुशी

मूल घाबरते किंवा त्याला दुखापत होते, तेव्हा आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत त्याला सहज दिलासा मिळतो. रडणारे मूल सर्वप्रथम हाच आधार शोधते. आपलेही असेच असले पाहिजे. आपल्याला आधाराची गरज असते तेव्हा आपण स्वर्गातील आपल्या पित्याच्या आणि आपला तारणारा येशू याच्या कुशीत धाव घेतली पाहिजे. आपण…

चिंतन 66: दयेद्वारे न्याय

काही जणांना दिवसेंदिवस दुसऱ्या व्यक्तीच्या कठोर आणि क्रूर वागणुकीला सामोरे जावे लागते. हे फार वेदनादायक असते. त्यामुळे, दुःख देणाऱ्या व्यक्तीला तिच्या कृत्यांचा जाब विचारला जावा आणि न्याय मिळावा, अशी तीव्र इच्छा होऊ शकते. पण खरा प्रश्न असा आहे: प्रभू मला काय करायला बोलावत आहे? मी कसा प्रतिसाद देऊ…

चिंतन ३२: क्षमेतून प्रकटणारी दया

आयुष्यभर इतरांच्या पापांमुळे तुम्ही दुखावले जाल. हे अटळ आहे. खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की, या दुःखाचे तुम्ही काय कराल? ते मनात धरून त्याचाच विचार करत राहाल का? की तुम्ही क्षमा कराल? पण केवळ क्षमा करणे पुरेसे नाही. दैवी दयेला तुमच्या आत्म्यात इतके खोलवर उतरू दिले पाहिजे की…