मराठी

चिंतन 307: दैवी मित्राशी संवाद

प्रार्थनेत मग्न एक एकांतवासी, गेरिट डाऊ यांच्या चित्रशाळेतील कलाकृती Video तुम्ही प्रार्थना कशी करता? प्रार्थना करण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. त्यांपैकी काही नेहमीचे मार्ग असे: पवित्र मिस्साबलिदानात किंवा इतर उपासना विधीत सहभागी होणे, …

पुढे वाचा

चिंतन 184: पुरोहितांच्या सेवाकार्यातून लाभणारी दया

नाही, पुरोहित परिपूर्ण नाहीत.  त्यांच्याकडूनही दिवसेंदिवस पापे घडतात.  इतर सर्व माणसांप्रमाणेच त्यांनाही दैनंदिन जीवनात सतत पश्चात्ताप करण्याची आणि देवाकडे वळण्याची गरज असते.  तरीही ते पुरोहित आहेत.  आणि त्यांच्या पवित्र पुरोहिताभिषेकामुळे प्रभू त्यांच्याद्वारे स्पष्टपणे बोलतो, तरी…

चिंतन 178: केवळ स्वतःच्या बळावर पवित्रता कधीच साधता येत नाही

तुम्हाला पवित्र जीवन जगण्याची आकांक्षा आहे का? असेल, तर केवळ स्वतःच्या बळावर तुम्हाला ते साधता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची, किंबहुना अनेकांची मदत लागते. इतरांकडून प्रेमळ मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूने आपल्यासाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. काही जणांना अनेक वर्षांपासून एका आध्यात्मिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभते…

चिंतन 84: पवित्र ख्रिस्तप्रसाद

परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तावर आपण कितीही गाढ प्रेम केले आणि कितीही भक्तिभावाने त्याची आराधना केली, तरी ते पुरेसे ठरणार नाही. परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तासमोर आपण असतो, तेव्हा त्या रूपाआड खरोखर उपस्थित असलेला सर्वशक्तिमान देव आपल्याला दिसला पाहिजे. तोच दया, शाश्वत जीवन, सनातन…

चिंतन 64: देवाचा आवाज ऐकणे

तुम्ही चर्चमध्ये असता तेव्हा लक्ष देऊन ऐकता का? विशेषतः, तुम्ही देवाचा आवाज ऐकता का? अनेकदा आपण प्रवचन ऐकायला बसतो, पण आपले मन भरकटते आणि प्रवचनात सांगितलेले सगळेच किंवा त्यातले बरेचसे आपल्या कानावरून जाते. तुमचे मन कुठे भरकटते? खरे तर, कधीकधी मनाचे असे भरकटणे…

चिंतन 52: दररोजची प्रार्थना

तुमच्या आत्म्याला सुंदर काय बनवते?  प्रार्थना.  तुम्हाला पापापासून दूर काय ठेवते?  प्रार्थना.  तुमचे मन आशेने काय भरून टाकते?  प्रार्थना.  पवित्रतेच्या मार्गावर तुम्हाला पुढे काय नेते?  प्रार्थना.  प्रार्थना ही सर्व गोष्टींची गुरुकिल्ली आहे.  प्रार्थनेशिवाय प्रत्येक दिवशी…

चिंतन 45: पवित्र परमप्रसाद

कधीकधी आपल्याला मिस्साला जावेसे वाटत नाही, किंवा परमपवित्र संस्कार ग्रहण करण्यासाठी पुढे जाताना आपले मन फार विचलित झालेले असते. अशा वेळी पवित्र आज्ञाधारकतेने वागणे हा कदाचित सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. दर रविवारी आणि प्रत्येक पवित्र सणाच्या दिवशी तुम्ही पवित्र परमप्रसाद ग्रहण करावा, अशी येशूची इच्छा आहे…