मराठी

चिंतन 319: एकटेपणाला सामोरे जाताना

एकटेपणा ही अनेकांना सोसावी लागणारी खोल वेदना आहे. ती इतकी बोचते, याचे एक कारण म्हणजे एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तीला ती वेदना एकट्यानेच सोसावी लागते. तिचे दुःख हलके करायला फार थोडी माणसे असतात, कधी तर कोणीच नसते. तसे नसते, तर त्या व्यक्तीला एकटेपणा जाणवला नसता. विशेष म्हणजे, ज्यांच्या भोवती इतर माणसे असतात त्यांनाही..

चिंतन 314: दया हे संरक्षणाचे भक्कम कवच

सैन्याला वेढा पडला की ते स्वतःचा बचाव करता येईल अशी जागा शोधते. ते लगेच एखादी उंच जागा किंवा आसरा आणि संरक्षण मिळेल असे ठिकाण शोधू लागते. तुझ्या आध्यात्मिक जीवनातही असेच असले पाहिजे. जेव्हा त्या दुष्टाचे बाण तुझ्यावर येतात किंवा जेव्हा जीवन…

चिंतन 282: दुःख, छळ, दुर्व्यवहार आणि अपमान

हे शीर्षक पहिल्या नजरेत तुम्हाला आकर्षक वाटणार नाही. या गोष्टी सहन कराव्यात असे कोणाला वाटेल? पण येशूने हे सर्व अत्यंत तीव्र स्वरूपात सहन केले, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. येशू आनंदी होता का? त्याच्या आत्म्यात शांती होती का? निःसंशय. यावरून आपल्याला हे उमगते की…

चिंतन 277: तणाव दूर करणारी दया

ताणतणाव हा अनेकदा जीवनाचा एक भाग असतो.  काही जणांना दैनंदिन जीवनात खूप ताण, वैफल्य आणि अगदी तीव्र रागालाही सामोरे जावे लागते.  दुसऱ्याचा राग पाहून तुम्ही सुरुवातीला सावध होऊ शकता आणि भीतीला बळी पडण्याचा मोह होऊ शकतो.  ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.  दुसऱ्याचा राग तुम्हालाही प्रतिक्रिया द्यायला भाग पाडू शकतो…

चिंतन 268: मृत्यूचे चिंतन

स्वतःच्या मृत्यूचा विचार करणे कदाचित तुम्हाला भयावह वाटत असेल. प्रत्यक्षात तुम्ही त्याचा फारसा विचार करत नसाल. पण स्वतःच्या मृत्यूला पूर्ण विश्वासाने थेट सामोरे जाता येणे ही एक कृपा आहे. आणि तुमचे जीवन नीट असेल तरच तुम्हाला इतक्या विश्वासाने मृत्यूला सामोरे जाता येईल…

चिंतन 263: वादळात देव तुमचा सुकाणूधारक

कल्पना करा की तुम्ही एक लहान मूल आहात आणि भर समुद्रात एका छोट्या होडीत आहात.  वादळ उठते आणि तुम्हाला कोणत्याही दिशेला किनारा दिसत नाही.  लाटांच्या प्रत्येक तडाख्याने होडीचे पुढचे टोक पाण्याखाली जाते, तुम्ही होडीत या बाजूला त्या बाजूला फेकले जाता आणि यातून आपण कसे वाचणार, असा प्रश्न तुम्हाला पडतो.  आता कल्पना करा की तुमचे बाबा…

चिंतन 233: मौनाचा प्रतिसाद

जीवनात आपल्याला जे अनुभव येतात, त्यांविषयी देवाशी मनमोकळेपणाने आणि सविस्तर बोलणे कधीकधी उपयोगी ठरते. तुम्हाला अगदी बोलतच राहावेसे वाटेल. आणि देव ऐकेल…

चिंतन 232: वादळ शांत करणे

येशूने वादळ शांत केले तो प्रसंग आठवा (मत्तय 8:23-27).  जीवनात तुम्हाला ज्या विशिष्ट अडचणींना सामोरे जावे लागते, त्यांत तो तुम्हाला शांती देईल, याचे भविष्यसूचक चिन्ह म्हणून त्याने हा चमत्कार केला…

चिंतन 207: ख्रिस्ताच्या हृदयात सांत्वन

प्रेमळ आणि मायाळू आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत शिरल्यावर मुलांना अनेकदा खूप दिलासा मिळतो. त्या प्रेमळ मिठीत त्यांना खूप समाधान वाटते. अशा क्षणी भीती आणि काळजी दूर होतात आणि मन व्याकुळ झाले असेल, तर त्याला पुन्हा शांती आणि दिलासा मिळतो. तसेच असले पाहिजे…

चिंतन 205: शांतीचा किल्ला

प्रभूची शांती एका किल्ल्यासारखी आहे. दुष्टाकडून बाहेरून होणाऱ्या सर्व हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपण या किल्ल्यात आश्रय घेतला पाहिजे.  या किल्ल्याबाहेर आपण या सर्व द्वेषपूर्ण हल्ल्यांना उघडे पडतो.  पवित्र संरक्षणाशिवाय क्रोध, दडपशाही, फसवणूक आणि मत्सर यांचे बाण आपली मोठी हानी करू शकतात…