मराठी

चिंतन 254: दैवीकरण

आपल्या जीवनातील पाचारणाचे वर्णन ‘दैवीकरणासाठीचे पाचारण’ असे करता येईल. याचा अर्थ काय? देव पृथ्वीवर आला आणि त्याने आपला मानवी स्वभाव धारण केला, जेणेकरून त्याने आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात सहभागी करून घ्यावे. एका अर्थाने, देव होण्यासाठीच आपल्याला पाचारण आहे. ‘दैवीकरणाची’ ही संकल्पना…

चिंतन 253: संपूर्ण कृतज्ञतेचा प्रतिसाद

देवाला आपला प्रतिसाद कसा असावा? देवाशी असलेल्या आपल्या नात्यातही आपण अनेकदा स्वतःतच गुरफटून जातो. आपले लक्ष आपल्या अडचणींवर आणि गरजांवरच राहते. या साऱ्या गोष्टी देवावर सोपवून आपण त्यांची चिंता सोडून दिली पाहिजे. असे केल्यावर देवाचे वैभव आणि चांगुलपणा आपल्याला दिसू लागेल…

चिंतन 252: दया आणि स्वीकार यांचे प्रेषितकार्य

काही जण जीवनात फार व्याकूळ असतात आणि त्यांना आपल्या अडचणींतून मार्ग काढता येत नाही असे वाटते. ते ‘गरजू’ असतात, म्हणजेच कशातून तरी दिलासा मिळावा म्हणून ते सतत शोध घेत असतात. धनसंपत्ती किंवा इतर ऐहिक सुखांतून मिळणारा दिलासाच आपल्याला हवा आहे असे त्यांना वाटत असेल, पण…

चिंतन 251: तुमच्या हृदयातील निवासस्थान

प्रभू तुमच्याकडे येऊन तुमच्या हृदयात वास करू इच्छितो. पण तो तुमच्याकडे येतो तेव्हा त्याला काय आढळते? तुमच्या हृदयाची अवस्था कशी आहे? काही हृदये सुवासिक गुलाबांच्या बागेसारखी असतात. तिथे प्रकाश, सौंदर्य, वैभव आणि …

चिंतन 250: जमिनीवर साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करणे

प्रार्थना करताना तुम्ही आपल्या प्रभूकडे कसे जाता? प्रेमाने आणि भक्तिभावाने आपला संपूर्ण दिवस त्याला अर्पण करणे आणि दिवसभर आपल्या जिवलग मित्राशी बोलावे तसे त्याच्याशी बोलणे, हे नक्कीच चांगले आहे. पण काही प्रसंगी आपली प्रार्थना उत्कट असली पाहिजे आणि ती व्यक्त करताना…

चिंतन 249: दुःखाचे फळ

खूप दुःख सोसल्यानंतरच अशा दुःखातून कोणती चांगली फळे मिळू शकतात, हे माणसाला समजू लागते. दुःख हे मुळात आपल्या पतित मानवी अवस्थेचा परिणाम आहे. पण येशूने आपली मानवी अवस्था स्वीकारली आणि…

चिंतन 248: अमर्याद संसाधने

कल्पना करा की अगदी थोड्या प्राणवायूपासून अमर्याद ऊर्जा निर्माण करणारे यंत्र तुम्ही बनवले आणि त्यातून तुम्हाला नैसर्गिक संसाधनांचा अक्षय स्रोत सापडला.  तुम्हाला फक्त तुम्ही बनवलेले यंत्र सुरू करायचे आहे, आणि ऊर्जा निर्माण होऊ लागते…

चिंतन 247: गरजू व्यक्ती आपल्यासाठी आशीर्वाद

तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल, तुरुंगात असेल किंवा तिला एखाद्या गंभीर परिस्थितीत मदतीची नितांत गरज असेल, तर ती परिस्थिती तुम्हाला ओझे वाटेल की आशीर्वाद? याचा विचार करा. विशेष काळजीची गरज असलेल्या व्यक्तींमुळे तुमचे जीवन अधिक कठीण होते का? या प्रश्नाचे उत्तर केवळ व्यवहाराच्या दृष्टीने दिले, तर…

चिंतन 246: पवित्र परमप्रसाद ग्रहण केल्यानंतर

पवित्र परमप्रसाद ग्रहण केल्यानंतर तुम्ही काय करता? मन इकडे तिकडे भटकत असताना तुम्ही आपल्या बाकाकडे परतता का? आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष गेल्यामुळे आपल्या प्रभूशी खरी आध्यात्मिक भेट होण्याची संधी तुम्ही गमावता का? की तो क्षण खऱ्या प्रार्थनेचा आणि देवाशी एकरूप होण्याचा क्षण होऊ देता…

चिंतन २४५: कठोर न्याय तूर्त रोखून ठेवला आहे

येशूला इथे आणि आत्ताच आपला न्याय अमलात आणण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या पापांमुळे आपल्याशी कठोरपणे वागण्याचा आणि आपल्यावर शाश्वत न्यायाचा निकाल देण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्याच्या दयेमुळे या सत्याचा अनेकदा विसर पडतो. पण…