चिंतन 201: तुरुंगात येशूसोबतची रात्र
कल्पना करा, एखाद्या गूढ रीतीने तुम्हाला पवित्र गुरुवारच्या त्या रात्रीत जाता आले, तर ते कसे असेल? येशूने जे काही सोसले, ते सर्व तुम्हाला पाहता आणि अनुभवता आले, तर? बागेत येशूला झालेल्या मरणयातना, त्याची झालेली टवाळी आणि त्याला मिळालेली निर्दयी वागणूक यांची कल्पना करा…
