मराठी

चिंतन 292: विशेष पाचारणांचे मोल

काही जणांना संन्यस्त जीवनात प्रार्थनेत आणि एकांतात एक आगळे जीवन जगण्याचे पाचारण असते. विशेषतः काहींना एकांतवासी म्हणून किंवा मठाच्या एकांतात राहण्याचे पाचारण असते. हे पवित्र आत्मे जगापासून दूर राहतात आणि शांतपणे प्रार्थना व काम करण्यात आपले दिवस घालवतात. पण…

चिंतन 291: न बोलता आणि कुणालाही न कळू देता सोसलेल्या दुःखाचे मोल

एखाद्या गोष्टीचे ओझे आपल्याला जाणवते, तेव्हा आपण अनेकदा आपल्या दुःखाबद्दल मोकळेपणाने बोलून इतरांकडून सांत्वन मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही प्रमाणात आपले ओझे दुसऱ्या कुणाशी वाटून घेणे हिताचे ठरू शकते; पण त्याबद्दल न बोलता, ते कुणालाही न कळू देता स्वीकारण्यातही मोठे मोल आहे. हे…

चिंतन 290: शारीरिक वेदनांचे मुक्तिदायी रूपांतर

अनेकांचे आरोग्य उत्तम असते, तर काहींचे तसे नसते. आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे काहींना फार शारीरिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्याचे उपाय अनेक जण शोधतात. तरीही या वेदनांमधून देवाची कृपा मिळण्याची संधी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम…

चिंतन 249: दुःखाचे फळ

खूप दुःख सोसल्यानंतरच अशा दुःखातून कोणती चांगली फळे मिळू शकतात, हे माणसाला समजू लागते. दुःख हे मुळात आपल्या पतित मानवी अवस्थेचा परिणाम आहे. पण येशूने आपली मानवी अवस्था स्वीकारली आणि…

चिंतन २४५: कठोर न्याय तूर्त रोखून ठेवला आहे

येशूला इथे आणि आत्ताच आपला न्याय अमलात आणण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या पापांमुळे आपल्याशी कठोरपणे वागण्याचा आणि आपल्यावर शाश्वत न्यायाचा निकाल देण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्याच्या दयेमुळे या सत्याचा अनेकदा विसर पडतो. पण…

चिंतन 243: येशूचे ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी त्याची खास देणगी

तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिच्याशी तुम्ही कसे वागाल? आपल्या कुटुंबीयांना किंवा अगदी जवळच्या मित्रांना जे सर्वांत हिताचे आहे आणि ज्याने त्यांना आनंद मिळेल, तेच त्यांना लाभावे, अशी सहसा आपली इच्छा असते. देवाचीही आपल्यापैकी प्रत्येकासाठी हीच इच्छा आहे. परंतु देवाच्या दृष्टीने आपल्या आनंदाचा खरा स्रोत कोणता आहे, हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू शकते…

चिंतन 240: जीवनात गोडवा की कडूपणा?

तुमच्या जीवनात तुम्हाला काय अधिक आवडेल? रोजच्या अनुभवांत इंद्रियांना जाणवणारा गोडवा की कडूपणा? दुसऱ्या शब्दांत, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला तुम्हाला आवडेल, की रोजचे कर्तव्य पार पाडल्यावर तुमच्या मनात काहीसा कडूपणा उरावा असे तुम्हाला…

चिंतन 236: सर्वांना देवाची दया लाभावी म्हणून प्रार्थना

प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे, आणि आपल्यापैकी प्रत्येकावर त्याच्या विशिष्ट गरजांनुसार आपली दया विपुलपणे बरसवावी, अशी देवाची इच्छा आहे. लोकांसाठी प्रार्थना करताना, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या गटांनाही देवाच्या हाती सोपवणे चांगले आहे…

चिंतन 229: रोजचे रक्तसाक्षित्व

आरंभीच्या ख्रिस्तसभेतील एक धर्मपिता तेर्तुलियन म्हणाले, “रक्तसाक्षींचे रक्त हे ख्रिस्तसभेचे बीज आहे.” याचा अर्थ असा की श्रद्धेसाठी स्वतःचे रक्त सांडणे ही अंतिमतः शोकांतिका नाही…

चिंतन 177: पवित्र आज्ञापालन

देवाच्या इच्छेऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यापासून आपल्याला जपणाऱ्या सर्वांत प्रभावी साधनांपैकी एक म्हणजे पवित्र आज्ञापालन. व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून आज्ञापालन करण्याचे वरदान लाभते. ही बाह्य आचरणाची सवय ते अंतःकरणात रुजवू शकतात, जेणेकरून त्यांना खात्री होईल की ते जगत आहेत…