मराठी

चिंतन 305: देवाच्या प्रेमाची अगाध खोली

कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्यासाठी स्वतःचा जीव दिला. त्या व्यक्तीसमोर अशी परिस्थिती आली की, आपण स्वेच्छेने स्वतःचा जीव दिला नाही, तर तुमचा जीव जाईल, हे तिला माहीत होते. म्हणून ती व्यक्ती न डगमगता पुढे आली आणि तिने तुमच्या जीवाच्या बदल्यात स्वतःचा जीव दिला. असे करण्यासाठी…

चिंतन 208: दयेचा आध्यात्मिक बाण

सामान्यतः बाण जखमी करतो आणि जीव घेतो.  इतिहासभर युद्धासाठी आणि शिकारीसाठी बाणांचा वापर झाला आहे.  पण दयेचा आध्यात्मिक बाण अगदी वेगळा आहे.  शिमोन संदेष्ट्याने आपल्या धन्य मातेला सांगितलेले शब्द आठवा: “आणि तुझ्याही अंतरातून तलवार आरपार जाईल” (लूक 2:35).  आणि…

चिंतन 201: तुरुंगात येशूसोबतची रात्र

कल्पना करा, एखाद्या गूढ रीतीने तुम्हाला पवित्र गुरुवारच्या त्या रात्रीत जाता आले, तर ते कसे असेल? येशूने जे काही सोसले, ते सर्व तुम्हाला पाहता आणि अनुभवता आले, तर? बागेत येशूला झालेल्या मरणयातना, त्याची झालेली टवाळी आणि त्याला मिळालेली निर्दयी वागणूक यांची कल्पना करा…

चिंतन 197: मला तहान लागली आहे

“मला तहान लागली आहे.” या साध्या उद्गारांत किती गहन अर्थ दडला आहे! आपल्या प्रभूने क्रूसावरून हे उद्गार काढले. एका सैनिकाने त्याची तहान शमवण्यासाठी द्राक्षारसापासून बनलेल्या शिऱ्यात भिजवलेला स्पंज त्याला देऊन थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. द्राक्षारसाचा झालेला शिरका हा अशा आत्म्याचे प्रतीक आहे, जो…

चिंतन १४२: प्रभूची शांती दुष्टाई दूर करते

सैतानाचे, म्हणजेच त्या दुष्टाचे, अस्तित्व मान्य करणे महत्त्वाचे आहे. त्याचा संताप आणि द्वेष किती तीव्र आहेत, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्याचा द्वेष इतका तीव्र आहे की त्याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. आपला द्वेष करणे आणि आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपला नाश करण्याचा प्रयत्न करणे थांबवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. हे जाणून घेणे का…

चिंतन 137: क्रूसाचे सामर्थ्य

प्रार्थना करताना तुम्ही कधी बसून क्रूसावरील येशूची प्रतिमा न्याहाळता का? बाहेरून पाहणाऱ्याला ही प्रतिमा एक कोडे वाटू शकते. एवढ्या भयावह घटनेचे चिन्ह आपण उंच का उभारतो आणि त्याचा सन्मान का करतो? देवाच्या पुत्राचा इतक्या क्रूरपणे वध झाला, या घटनेकडे सुरुवातीला आपल्याला ओढ वाटेलच असे नाही. तरीही…

चिंतन 70: दुःख भोगणाऱ्या ख्रिस्ताशी एकरूप होणे

ख्रिस्ताचे कोणते रूप तुम्हाला अधिक जवळचे वाटते? कोणत्या रूपाशी तुम्ही अधिक सहजपणे एकरूप होऊ शकता? सर्वांचा राजा म्हणून गौरवलेला ख्रिस्त, की मारहाण सोसून दुःख भोगणारा ख्रिस्त? शेवटी, गौरव आणि वैभवाने प्रकट झालेल्या प्रभूवर आपली दृष्टी खिळून राहील आणि हाच…

चिंतन 53: प्रार्थनेतील अडचणी

रोज प्रार्थना करण्याची सवय लावताना आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी येतात.  अंतर्गत अडचणी: निरुत्साह, प्रार्थनेत जाणवणारा कोरडेपणा, मनाचा जडपणा आणि मोह.  संयमाने आणि चिकाटीने या अडचणींवर मात करता येते.  बाह्य अडचणी…

featured image DM

चिंतन 5: जगाचा उद्धार

देहधारण हे आजवर ज्ञात असलेले दयेचे सर्वांत महान कृत्य होते. त्याहूनही महान असे एकच कृत्य नंतर घडले: येशूने क्रूसावर प्राण दिले आणि आपल्या रक्ताने पाप व मृत्यू यांचा नाश केला. क्रूसावर सांडलेल्या रक्ताद्वारे जगाचा झालेला उद्धार हे प्रेमाचे आणि दयेचे कृत्य आहे…