मराठी

चिंतन 184: पुरोहितांच्या सेवाकार्यातून लाभणारी दया

नाही, पुरोहित परिपूर्ण नाहीत.  त्यांच्याकडूनही दिवसेंदिवस पापे घडतात.  इतर सर्व माणसांप्रमाणेच त्यांनाही दैनंदिन जीवनात सतत पश्चात्ताप करण्याची आणि देवाकडे वळण्याची गरज असते.  तरीही ते पुरोहित आहेत.  आणि त्यांच्या पवित्र पुरोहिताभिषेकामुळे प्रभू त्यांच्याद्वारे स्पष्टपणे बोलतो, तरी…

चिंतन १८३: दुःखाच्या मोलाची जाणीव

आपल्याला दुःख होते तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधतो. आपल्याला दिलासा हवा असतो. पण स्वर्गातून मागे वळून पाहताना, आपण स्वेच्छेने निवडलेल्या आणि स्वीकारलेल्या दुःखाचे अपार सामर्थ्य आपल्याला दिसेल. दुःख हे स्वतःतच चांगले आहे असे नाही; तर दुःखाचे उद्धार झाले आहे आणि त्याला लाभले आहे…

चिंतन 182: गर्वाची गुपिते उलगडण्याचे शहाणपण

गर्व आपल्याला पूर्णपणे ग्रासू शकतो.  असे झाले की आपल्याला फक्त स्वतःचाच आणि स्वतःच्या वेदनेचाच विचार सुचतो.  कदाचित तुम्हालाही असा अनुभव आला असेल.  कदाचित तुमचे मन दुखावले गेले असेल आणि तुम्ही त्या जखमेचा विचार करत खिन्न होऊन बसत असाल.  त्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होते आणि ती जखम भरून यावी म्हणून तुम्ही प्रयत्न करता.  पण…

चिंतन 181: पवित्र अलिप्तता

तुमच्यासाठी देवाची इच्छा नेमकी काय आहे, याला महत्त्व आहे का?  सुरुवातीला हा प्रश्न विचित्र वाटेल.  पण जरा विचार करा.  तुम्ही काय करावे अशी देवाची इच्छा आहे, याने काही फरक पडतो का?  त्याने तुम्हाला सतत काम करण्यासाठी बोलावले तर?  किंवा शांतपणे विसावा घेण्यासाठी बोलावले तर?  किंवा…

चिंतन 180: येशूचे दुःखसहन

शुभवर्तमानांशी परिचित असलेले आपणही कधीकधी ख्रिस्ताच्या दुःखसहनाविषयी काहीसे उदासीन होऊ शकतो. दरवर्षी आपण हे वृत्तांतवाचन ऐकतो आणि ख्रिस्ताच्या दुःखसहनाची अनेक चित्रेही आपण पाहिली आहेत. या सवयीमुळे त्याचा आपल्यावर व्हायला हवा तसा परिणाम होऊ दिला जात नाही…

चिंतन 179: अंतर्मनातील उदासीला सामोरे जाताना

“प्रभू देतो आणि प्रभूच काढून घेतो…” (ईयोब 1:21).  हे किती खरे आहे!  जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा देवाकडून आपल्याला भरभरून सांत्वन मिळते.  कुटुंबात मोठा आनंद असतो तेव्हा किंवा एखाद्या व्यक्तीचे निरपेक्ष प्रेम आपल्याला अनुभवायला मिळते तेव्हा असे घडू शकते.  कधी कधी…

चिंतन 178: केवळ स्वतःच्या बळावर पवित्रता कधीच साधता येत नाही

तुम्हाला पवित्र जीवन जगण्याची आकांक्षा आहे का? असेल, तर केवळ स्वतःच्या बळावर तुम्हाला ते साधता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची, किंबहुना अनेकांची मदत लागते. इतरांकडून प्रेमळ मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूने आपल्यासाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. काही जणांना अनेक वर्षांपासून एका आध्यात्मिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभते…

चिंतन 177: पवित्र आज्ञापालन

देवाच्या इच्छेऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यापासून आपल्याला जपणाऱ्या सर्वांत प्रभावी साधनांपैकी एक म्हणजे पवित्र आज्ञापालन. व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून आज्ञापालन करण्याचे वरदान लाभते. ही बाह्य आचरणाची सवय ते अंतःकरणात रुजवू शकतात, जेणेकरून त्यांना खात्री होईल की ते जगत आहेत…

चिंतन 176: जगाच्या पापाशी संघर्ष

देव जगाकडे पाहतो तेव्हा त्याला काय दिसते? त्याला आपल्या सृष्टीचे सौंदर्य, आपल्या योजनेतील परिपूर्ण सुव्यवस्था आणि आपल्या पुत्रकन्यांची उपस्थिती नक्कीच दिसते. पण असंख्य पापांचे भयानक स्वरूपही त्याला दिसते. अगदी लहानसे पापही…

चिंतन 175:  जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टींत प्रेम सापडते

आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट विश्वासाने सांगता येईल असा मित्र असणे किती छान आहे!  इतरांना जाणून घ्यावे आणि त्यांनीही आपल्याला जाणून घ्यावे, अशी आपल्याला आस असते.  अगदी किरकोळ अडचणही ज्याला विश्वासाने सांगता येते किंवा अगदी छोटासा आनंदही ज्याच्याजवळ व्यक्त करता येतो, अशी व्यक्ती भेटली की तुम्हाला खरा मित्र सापडला असे समजा.  प्रभू…