मराठी

चिंतन 44: प्रभूची दृष्टी भय दूर करते

आपला प्रभू रात्रंदिवस तुमच्याकडे निरपेक्ष प्रेमाने आणि मायेने पाहतो, हे तुम्हाला माहीत आहे का?  तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याला माहीत आहे आणि प्रत्येक प्रसंगात तो तुमच्या सोबत चालतो, हे तुम्हाला माहीत आहे का?  यावर विश्वास ठेवणे कठीण वाटू शकते, कारण आपण त्याचा आवाज कानांनी ऐकू शकत नाही, त्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा…

चिंतन 43: संकटात संयम

देवाच्या दृष्टीने कशाला अधिक मोल आहे? तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवण्याला, की जीवनातील प्रत्येक संकट संयमाने आणि मनःशांतीने सहन करण्याला? अनेकांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण वाटेल आणि दोन्ही पर्याय निवडावेसे वाटतील. आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि…

चिंतन 42: अन्यायकारक वागणूक प्रायश्चित्त म्हणून अर्पण करणे

जीवनात अनेकदा आपल्याशी अन्यायाने वागले जाते. अशा वेळी प्रतिकार करावा, स्वतःचा बचाव करावा आणि न्याय मिळेल याची खात्री करावी, ही आपली पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. पण येशूने असे केले का? नाही. तो मौन राहिला आणि त्याने सर्व अन्याय आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी बलिदान म्हणून स्वीकारला. तोच तो…

चिंतन 41: भावना विरुद्ध श्रद्धा

कधी कधी सत्याने आपल्याला फारसा दिलासा मिळत नाही असे वाटते. हे ऐकायला विचित्र वाटेल. पण प्रामाणिकपणे पाहिले तर, आपल्याला जे वाटते ते खरे नाही हे माहीत असूनही कधी कधी आपण मनातून दुःख सोसतो. उदाहरणार्थ, देव आपल्या सोबत आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो, याची आपल्याला खात्री असू शकते; पण…

चिंतन ४०: आपल्या प्रभूच्या हृदयात प्रवेश

बहुतेक परिस्थितीत धुळीचा एखादा कण किंवा वाळूचा एखादा दाणा फारसा महत्त्वाचा वाटत नाही. अंगणात किंवा घराच्या जमिनीवर पडलेल्या अशा एखाद्या कणाकडे कोणाचेही लक्ष जात नाही. पण तोच कण डोळ्यात गेला तर तो लगेच जाणवतो. का? कारण…

चिंतन 39: आध्यात्मिक सांत्वन हरपणे

आपण येशूचे अनुयायी आहोत, म्हणून आपण जे काही करतो त्यात आपल्याला सतत दिलासा आणि सांत्वन मिळायला हवे, असे सहज वाटू शकते. पण ते खरे आहे का? एका अर्थी हो, तर दुसऱ्या अर्थी नाही. आपण नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो आणि तसे वागत आहोत याची आपल्याला जाणीव असली, तर एका अर्थाने आपल्याला सतत सांत्वन मिळेल. मात्र…

चिंतन 38: आपले रोजचे कर्तव्य

काहींना आपले जीवन नीरस आणि एकसुरी वाटत असेल. दिवसेंदिवस तेच ते चालू असते. कधीकधी आपण काहीतरी नवे, उत्साहवर्धक अनुभव शोधतो. पण जीवनातल्या साध्या, पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या आणि एकसुरी वाटणाऱ्या कामांतही आपण देवाच्या कृपेला रोज आपली सोबत करू दिली, तर…

चिंतन 37: नम्रता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा

आज तीन शब्दांवर चिंतन करूया: नम्रता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा. नम्र जीवांना देव दिसतो आणि ते त्याला ओळखतात, कारण गरजेच्या वेळी ते स्वतःवर अवलंबून राहत नाहीत. देवच सर्वस्व आहे आणि त्याच्याविना आपण काहीच नाही, हे ते जाणतात. साध्या मनाचे जीव गुंतून पडत नाहीत…

चिंतन 36: आध्यात्मिक मैत्रीतून लाभणारी दया

कधीकधी जीवन कठीण वाटते. आपले आध्यात्मिक जीवन कोरडे झाले आहे किंवा ते आपल्याला पेलवत नाही, असे वाटू शकते. आपल्या पापांवर मात करणे आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू शकते. देवाशी आपले नाते जोपासणेही फार कठीण वाटू शकते. पण हे सारे अनुभव अशी कृपादाने आहेत की ती…

चिंतन 35: प्रभूच्या दुःखयातना जाणून घेणे

आपल्या प्रभूच्या दुःखयातना तुम्हाला समजतात का?  त्याच्या वेदना तुम्हाला तुमच्या आत्म्यात जाणवतात का?  सुरुवातीला हे नकोसे वाटू शकते.  पण आपल्या प्रभूच्या वेदना आणि त्याच्या दुःखयातना जाणवणे ही मोठी कृपा आहे.  त्याचे दुःख आपल्याला जाणवू लागते, तेव्हा आपण त्याला सामोरे गेले पाहिजे आणि ते आपलेच दुःख म्हणून स्वीकारले पाहिजे.  आपण…