मराठी

चिंतन 91: दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना दार उघडते

प्रार्थनेत मग्न संत पेत्र — चित्रकार: माथियास स्टोम

व्हिडिओ

दुसऱ्या व्यक्तीला खरोखर कशाची गरज आहे, हे केवळ देवालाच ठाऊक असते.  देवाने आपल्याला विशेष कृपा दिल्याशिवाय दुसऱ्याच्या आत्म्यात काय चालले आहे, हे आपल्याला जाणता येत नाही.  पण इतरांसाठी कळकळीने प्रार्थना करण्याचे आवाहन आपल्यापैकी प्रत्येकाला आहे.  कधी कधी, आपण देवाच्या प्रेरणेला प्रतिसाद देण्यास तयार असलो, तर एखाद्या व्यक्तीसाठी कळकळीने प्रार्थना करण्याची गरज तो आपल्या मनाला जाणवून देतो.  एखाद्या व्यक्तीसाठी विशेष प्रार्थना करण्याची हाक आपल्याला जाणवली, तर देव अचानक त्या व्यक्तीशी पवित्र आणि मनापासून संवाद साधण्याची संधी देतो, हे पाहून आपल्याला आश्चर्यही वाटेल. अशा संवादाची त्या व्यक्तीला नितांत गरज असते (पाहा दिनदर्शिका #396).

देवाने एखाद्या व्यक्तीची आठवण तुमच्या मनात जागवली आहे का?  एखादी विशिष्ट व्यक्ती वारंवार तुमच्या मनात येते का?  तसे असेल तर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा आणि देवाला सांगा की, त्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्याची तुमची इच्छा आणि तयारी आहे.  मग वाट पाहा आणि आणखी प्रार्थना करा.  देवाची तशी इच्छा असेल तर तुम्हाला दिसून येईल की, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीला दिलेल्या मोकळ्या प्रतिसादामुळे तिच्या जीवनात अनंतकाळासाठी फरक पडू शकतो.

हे प्रभू, मला कळकळीने प्रार्थना करणारे हृदय दे.  तू माझ्या वाटेवर आणलेल्या लोकांचे मोकळ्या मनाने स्वागत करण्यास मला मदत कर.  गरजूंसाठी प्रार्थना करताना मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो, जेणेकरून तू तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्याद्वारे कार्य करावे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सदतिसावा दिवस — चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत / सण