मराठी

चिंतन 144: तुमचे पावित्र्य ही इतरांसाठी एक देणगी आहे

आपली दैवी दया तुमच्या आत्म्यात ओतण्याची येशूची उत्कट इच्छा आहे. तुमच्या पापाचे रूपांतर करून तुम्हाला आपले परिपूर्ण निवासस्थान बनवावे, अशी त्याची इच्छा आहे. ही देणगी आपल्या आकलनापलीकडची आहे, तरीही ती स्वीकारण्याचे आमंत्रण आपल्याला आहे. आपल्या प्रभूकडून मिळणाऱ्या अगणित कृपादानांचा स्वीकार केवळ…

पुढे वाचा

चिंतन 143: विश्वास, विश्वास आणि आणखी विश्वास

या पुस्तकातील प्रत्येक चिंतनाचा शेवट प्रार्थनेने होतो आणि प्रत्येक प्रार्थनेच्या शेवटी आपण म्हणतो, “हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.” पण तुम्ही खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवता का? विश्वास ठेवणे ही केवळ एकदाच करण्याची कृती नाही. आपण विश्वास ठेवतो की नाही, एवढाच प्रश्न नाही. आपला विश्वास सतत अधिक खोल होत गेला पाहिजे. तो किती खोल जाऊ शकतो, याला मर्यादा नाही…

पुढे वाचा

चिंतन १४२: प्रभूची शांती दुष्टाई दूर करते

सैतानाचे, म्हणजेच त्या दुष्टाचे, अस्तित्व मान्य करणे महत्त्वाचे आहे. त्याचा संताप आणि द्वेष किती तीव्र आहेत, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्याचा द्वेष इतका तीव्र आहे की त्याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. आपला द्वेष करणे आणि आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपला नाश करण्याचा प्रयत्न करणे थांबवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. हे जाणून घेणे का…

पुढे वाचा

चिंतन 141: देवदूतांची दया

देवदूतांचे समुदाय ही किती मोलाची देणगी आहे, हे आपल्याला स्वर्गातच समजेल. देवाने प्रेमापोटी या तेजस्वी आध्यात्मिक जीवांना निर्माण केले. त्यांपैकी काहींना परमपवित्र त्रैक्याची अनंतकाळ उपासना व आराधना करण्यासाठीच निर्माण करण्यात आले. या सेवेला ते कधीही थकत नाहीत आणि देवाची उपासना करताना त्यांचे प्रेम सतत…

पुढे वाचा

चिंतन 140: इतरांनी आपल्याविषयी गैरसमज करून घेणे

इतरांशी वागताना कधी कधी ते तुम्हाला नीट समजून घेत नाहीत, असे तुम्हाला वाटते का? ती व्यक्ती कुटुंबातील एखादी जवळची व्यक्ती, एखादा मित्र, सहकारी किंवा आणखी कुणीही असू शकते. अडचण अशी आहे की तुमच्या मनातले विचार, अंतःकरणातल्या भावना, तुमची इच्छा, हेतू आणि आजवरचे सर्व अनुभव या साऱ्यांतून तुमच्या…

पुढे वाचा

चिंतन 139: ईश्वरी परिपालनानेच हे घडते

कधीकधी देवाने ठरवलेल्या वेळेआधीच त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण घाई करतो. परिणामी, देवाची इच्छा पूर्ण करण्याऐवजी आपण स्वतःचीच इच्छा पूर्ण करतो. धीर धरणे हीच गुरुकिल्ली आहे. प्रभूने आपल्यामध्ये कार्य करावे म्हणून आपण धीराने त्याची वाट पाहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याद्वारे सर्व काही करणारा तोच असेल. खरे तर…

पुढे वाचा

चिंतन 138: देवाची दया अनंत आहे

देवाची दया अनंत आहे, हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटणार नाही. पण ‘अनंत’ ही संकल्पना समजून घेणे सोपे नाही. खरे तर, ती समजून घेणे अशक्य आहे, असेही काही जण म्हणतील. ज्याला अंत नाही, सीमा नाही, त्याचा पूर्ण उलगडा होणे आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. तसेच…

पुढे वाचा

चिंतन 137: क्रूसाचे सामर्थ्य

प्रार्थना करताना तुम्ही कधी बसून क्रूसावरील येशूची प्रतिमा न्याहाळता का? बाहेरून पाहणाऱ्याला ही प्रतिमा एक कोडे वाटू शकते. एवढ्या भयावह घटनेचे चिन्ह आपण उंच का उभारतो आणि त्याचा सन्मान का करतो? देवाच्या पुत्राचा इतक्या क्रूरपणे वध झाला, या घटनेकडे सुरुवातीला आपल्याला ओढ वाटेलच असे नाही. तरीही…

पुढे वाचा

चिंतन 136: कृतज्ञ हृदयाचे सामर्थ्य

गेल्या महिन्याभरात तुम्ही कशा प्रकारे प्रार्थना केली, याकडे मागे वळून पाहिलेत, तर तुम्हाला काय दिसेल? आशा आहे की त्यात देवाला स्वतःला समर्पित करण्याचे, इतरांसाठी विनवणी करण्याचे, देवाची स्तुती आणि आराधना करण्याचे अनेक क्षण तुम्हाला दिसतील. तसेच, मनापासून आभार मानण्यात तुमची प्रार्थना रंगली, असेही अनेक क्षण तुम्हाला आठवतील…

पुढे वाचा

चिंतन 135: येशूशी संवाद

तुम्ही येशूशी संवाद साधता का?  प्रार्थनेचा हा एक अतिशय फलदायी प्रकार आहे.  देवाशी ‘संवाद’ साधणे हा प्रार्थनेचा सर्वोच्च प्रकार नाही, पण अनेकदा आपल्याला याच प्रकारच्या प्रार्थनेने सुरुवात करावी लागते.  मनावर एखादे ओझे असते, तेव्हा देवाशी संवाद साधणे विशेष फलदायी ठरते…

पुढे वाचा