मराठी

चिंतन 209: पापाच्या सवयीवर मात करणे

पापावर मात करण्यासाठी देवाची दया आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी पापावर मात करू पाहतो. पण ही धडपड व्यर्थ आहे, कारण केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या पापावर कधीही मात करू शकणार नाही. ज्या पापाशी तुम्ही झगडत आहात, त्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, आणि…

चिंतन 208: दयेचा आध्यात्मिक बाण

सामान्यतः बाण जखमी करतो आणि जीव घेतो.  इतिहासभर युद्धासाठी आणि शिकारीसाठी बाणांचा वापर झाला आहे.  पण दयेचा आध्यात्मिक बाण अगदी वेगळा आहे.  शिमोन संदेष्ट्याने आपल्या धन्य मातेला सांगितलेले शब्द आठवा: “आणि तुझ्याही अंतरातून तलवार आरपार जाईल” (लूक 2:35).  आणि…

चिंतन 207: ख्रिस्ताच्या हृदयात सांत्वन

प्रेमळ आणि मायाळू आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत शिरल्यावर मुलांना अनेकदा खूप दिलासा मिळतो. त्या प्रेमळ मिठीत त्यांना खूप समाधान वाटते. अशा क्षणी भीती आणि काळजी दूर होतात आणि मन व्याकुळ झाले असेल, तर त्याला पुन्हा शांती आणि दिलासा मिळतो. तसेच असले पाहिजे…

चिंतन 206: आध्यात्मिक साठेबाजी

आध्यात्मिक जीवनाला असलेल्या एका खऱ्या धोक्याला ‘आध्यात्मिक साठेबाजी’ असे म्हणता येईल. ही वृत्ती अशा व्यक्तीत दिसते, जी देवाच्या दयेचे साधन होण्याऐवजी ती दया स्वतःपुरतीच ठेवू पाहते. देवाची दया स्वतःपुरतीच ठेवण्याचा प्रयत्न करताना माणूस…

चिंतन 205: शांतीचा किल्ला

प्रभूची शांती एका किल्ल्यासारखी आहे. दुष्टाकडून बाहेरून होणाऱ्या सर्व हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपण या किल्ल्यात आश्रय घेतला पाहिजे.  या किल्ल्याबाहेर आपण या सर्व द्वेषपूर्ण हल्ल्यांना उघडे पडतो.  पवित्र संरक्षणाशिवाय क्रोध, दडपशाही, फसवणूक आणि मत्सर यांचे बाण आपली मोठी हानी करू शकतात…

चिंतन 204: तुमच्या आत्म्याचे पुष्पदलावरण

फुलाचे पुष्पदलावरण म्हणजे उमलू पाहणाऱ्या पाकळ्यांभोवती असलेले पानासारखे बाह्य आवरण. पाकळ्या वाढत असताना ते त्यांचे रक्षण करते. नाजूक पाकळ्यांना वाढण्यासाठी ते जणू एखाद्या ‘पाळणाघरा’सारखी जागा देते. या आडोशात पाकळ्या वाढतात आणि पुष्पदलावरण त्यांना सुरक्षित ठेवते. त्या पूर्ण वाढल्या की पुष्पदलावरण उघडते…

चिंतन 203: दयेची खोली आणि विस्तार

कल्पना करा की जगातल्या वाळूचा प्रत्येक कण मोजण्याचे काम तुम्हाला दिले आहे. हे काम अशक्य आहे, हे उघडच आहे. खरे तर, जगातल्या सगळ्या लोकांनी मिळून प्रयत्न केला, तरी त्यांना हे काम पूर्ण करता येणार नाही. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच असतात. याहूनही कठीण असे आणखी एक काम…

चिंतन 202: रोजचा एक स्मृतिदिन

स्मृतिदिन ही चिंतन करण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची आशीर्वादमय संधी असते.  काही स्मृतिदिन आनंदाचे असतात. उदाहरणार्थ, अनेक वर्षे पवित्र वैवाहिक जीवन जगलेल्या दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस.  तर काही स्मृतिदिन दुःखद असतात, जसे एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्युदिन.  तरीही…

चिंतन 201: तुरुंगात येशूसोबतची रात्र

कल्पना करा, एखाद्या गूढ रीतीने तुम्हाला पवित्र गुरुवारच्या त्या रात्रीत जाता आले, तर ते कसे असेल? येशूने जे काही सोसले, ते सर्व तुम्हाला पाहता आणि अनुभवता आले, तर? बागेत येशूला झालेल्या मरणयातना, त्याची झालेली टवाळी आणि त्याला मिळालेली निर्दयी वागणूक यांची कल्पना करा…

चिंतन 199: येशूशी ऐक्य म्हणजे इतरांशी ऐक्य

अनेक कारणांनी चर्च गौरवशाली आहे. तिच्यात आढळणारे ऐक्य हे तिच्या गौरवाचे एक अंग आहे. कधीकधी तिच्यात पुष्कळ फूट पडते, अनेकांना दुखापत होते आणि नानाविध प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो, हे खरे आहे. पण हे चर्चचे गुणधर्म नाहीत. हे पापांचे परिणाम आहेत…