मराठी

चिंतन 279: तुमच्या अंतःकरणातील खात्री

तुमच्या आत्म्यात उमटणाऱ्या अंतरीच्या खात्रीतून देव तुमच्याशी काय बोलतो, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. कधी देवाचा आवाज ठळक आणि स्पष्ट वाटेल, तर कधी तो क्षीण आणि संभ्रमात टाकणारा वाटेल. अनेक गोष्टींमुळे देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ शकते…

चिंतन 271: जीवनातील अडथळ्यांपलीकडे पाहणे

आपली दुःखे, झालेले अपमान आणि इतरांची चुकीची मते यांत मन अडकून राहणे ही एक सामान्य प्रवृत्ती आहे. बहुतेकांना या मोहाशी झुंज द्यावी लागते. यांपैकी एखादे ओझे किंवा अनेक ओझी आपल्याला वाहावी लागतात, तेव्हा त्यांनाच आपल्या जीवनाचे केंद्र बनवण्याचा मोह होऊ शकतो. उदाहरणार्थ…

चिंतन 266: पवित्रतेच्या ध्येयासमोर येणारी निराशा

तुम्हाला संत व्हायचे आहे का? तुमचे उत्तर “हो” असेल, अशी आशा आहे. पण तुम्ही संत होऊ शकता, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाचे उत्तर देणे कदाचित अधिक कठीण असेल. पवित्र होण्याचे स्वप्न पाहणे आणि तशी इच्छा बाळगणे सोपे आहे…

चिंतन 265: आवेगांचा धोका आणि आशीर्वाद

देवाने आपल्याला निर्माण करतानाच आवेग दिले. ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीत हे आवेग मोठे आशीर्वाद ठरू शकतात किंवा मोठे सापळे बनू शकतात. प्रत्येक आवेगाला कोणती गोष्ट चालना देते, यावर हे सारे अवलंबून आहे. उदाहरणार्थ, रागाचा आवेग चांगल्या किंवा वाईट कामासाठी वापरता येतो. जेव्हा राग आपला ताबा घेतो आणि त्या रागाचे मूळ…

चिंतन 241: आपल्या विशिष्ट पापांवर उपाय

तुम्ही आपल्या पापांवर मात कशी कराल?  प्रत्येक पाप वेगळे असते आणि त्याची आसक्ती सुटावी म्हणून त्यासाठी विशिष्ट प्रार्थना व त्याग आवश्यक असतात.  देहवासनेची, क्रोधाची आणि गर्वाची पापे ही तीन सामान्य प्रकारची पापे आहेत.  यांपैकी प्रत्येक पापावर मात करता येते, पण त्यासाठी विशेष…

चिंतन 223: एक भयावह दिवस

जीवनात कोणतीही गोष्ट भयावह असलीच पाहिजे असे नाही. आपण सोसत असलेला कितीही मोठा संघर्ष आणि दुःख देव सहजपणे आपल्या दयेचे आणि आपल्या पवित्रीकरणाचे साधन बनवू शकतो…

चिंतन 221: स्वतःचाच गौरव करणे

कधीकधी, जे स्वतः फार “धार्मिक” असतात, ते अनेक “धार्मिक” विषयांवर बोलतात. त्यांच्या बोलण्यात भक्तिभाव असतो आणि ते पवित्र गोष्टींविषयी बोलतात. पण शेवटी, लोकांच्या नजरेत स्वतःचा गौरव व्हावा, हाच त्यांच्या सगळ्या बोलण्याचा आणि वागण्याचा खरा हेतू असू शकतो. हाच तो संघर्ष…

चिंतन 209: पापाच्या सवयीवर मात करणे

पापावर मात करण्यासाठी देवाची दया आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी पापावर मात करू पाहतो. पण ही धडपड व्यर्थ आहे, कारण केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या पापावर कधीही मात करू शकणार नाही. ज्या पापाशी तुम्ही झगडत आहात, त्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, आणि…

चिंतन १९८: दुसऱ्याच्या भावनांशी खऱ्या समरसतेतून व्यक्त होणारी दया

दुसऱ्याच्या भावनांशी मनापासून समरस होण्याचा अभाव हे मानसिक, भावनिक आणि अगदी आध्यात्मिक पातळीवरील काही बिघाडाचे स्पष्ट लक्षण आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे याच्या उलटही खरे आहे. दुसऱ्याच्या भावनांशी मनापासून समरस होणे हे ती व्यक्ती मानसिक, भावनिक…

चिंतन 192: सुखदुःखात देवावर प्रेम करणे

सर्व काही सुरळीत असताना देवावर “प्रेम” करणे सोपे असते. पण सर्व काही सुरळीत असताना आपल्या प्रेमाची परीक्षा होत नाही. मानवी दुःखामुळे होणाऱ्या परीक्षेत आपले देवावरचे प्रेम किती खरे आहे, हे स्पष्ट होते. ही परीक्षा आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी फार फलदायी ठरू शकते. जीवनातील अडचणी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून…