मराठी

चिंतन 114: जगापासून अलिप्तता

पवित्र शास्त्रात ‘जगाचा’ अनेकदा उल्लेख येतो; विशेषतः खुद्द येशूने अनेकदा त्याचा उल्लेख केला आहे. जग तुमचा द्वेष करील आणि तुम्हाला समजून घेणार नाही, असे त्याने सांगितले. इतकेच नव्हे, तर जग तुमचा छळही करील. यामुळे काही जणांच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आपल्या मनातही असे घडते, जेव्हा…

चिंतन 113: सनातन पित्याला अर्पण

आपण करू शकणारी सर्वश्रेष्ठ प्रार्थना म्हणजे “अर्पणाची प्रार्थना.” अर्पणाची प्रार्थना म्हणजे वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या एकमेव बलिदानाशी एकरूप होऊन पित्याला केलेले बलिदान. आपण स्वतःला केवळ आपल्या बळावर अर्पण करत नाही. ख्रिस्त येशूशी एकरूप होऊन आपण स्वतःला अर्पण करतो. नेमके सांगायचे तर…

चिंतन 112: देवावरचे प्रेम देवाची ओढ वाढवते

जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता आणि त्या प्रेमात आनंद मानता, तेव्हा देवाविषयीची तुमची ओढ वाढते. तुम्ही त्याला जितके अधिक जाणून घ्याल, तितकी त्याला अधिक जाणून घेण्याची इच्छा वाढेल; आणि ती इच्छा जितकी वाढेल, तितके तुम्ही त्याला अधिक जाणून घ्याल. त्याचप्रमाणे, तुम्ही त्याच्यावर जितके अधिक प्रेम कराल, तितकी त्याच्यावर अधिक प्रेम करण्याची इच्छा वाढेल…

चिंतन 111: सैतानाचे खोटे बोल

सैतान आपल्याला अनेक प्रकारे मोहात पाडतो. आपल्यावर हल्ला करण्याची त्याची एक नेहमीची युक्ती म्हणजे आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देणे. आपण कबूल केलेल्या पापांचीही तो आठवण करून देतो. आपण चुकीच्या मार्गावर आहोत, देव आपल्यावर प्रसन्न नाही आणि आपण खोटारडे व पापी आहोत, असे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायला त्याला आवडते. आणि…

चिंतन 110: दयेचे किरण

येशूच्या हृदयातील दया तेजाने झळकते. संत फॉस्टिनाला दैवी दयेचे असेच दर्शन घडले. आपल्या प्रभूच्या उघड्या हृदयातून प्रकाशाचा आणि कृपेचा ओघ जगावर उसळून आला. आपला प्रकाश जगावर असाच पडत राहावा, अशी येशूची इच्छा आहे…

चिंतन 109: देवाची कुशी

मूल घाबरते किंवा त्याला दुखापत होते, तेव्हा आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत त्याला सहज दिलासा मिळतो. रडणारे मूल सर्वप्रथम हाच आधार शोधते. आपलेही असेच असले पाहिजे. आपल्याला आधाराची गरज असते तेव्हा आपण स्वर्गातील आपल्या पित्याच्या आणि आपला तारणारा येशू याच्या कुशीत धाव घेतली पाहिजे. आपण…

चिंतन १०८: ख्रिस्तसभेचा आवाज

देव संतांशी अनेक प्रकारे बोलला आहे. त्याने त्यांच्या अंतःकरणात दिलेल्या अनेक कृपादानांद्वारे आणि प्रेरणांद्वारेही तो त्यांच्याशी बोलला आहे. पण पवित्रतेचे सर्वोच्च शिखर गाठलेल्या गूढानुभवी व्यक्तीलाही अखेरीस देवाचा जो आवाज त्याच्या ख्रिस्तसभेद्वारे ऐकू येतो, त्यापुढे नम्रपणे मान तुकवावी लागते. ख्रिस्तसभा, विशेषतः…

चिंतन 107: पापस्वीकारात आपला आत्मा उघड करणे

देव आपल्या याजकांना त्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे पाठवतो. याजक परिपूर्ण नसले, तरी ते देवाचे प्रतिनिधी आहेत. समेटाच्या संस्कारात ही गोष्ट विशेषतः खरी ठरते. आपण या संस्कारासाठी जाणे अत्यावश्यक आहे…

चिंतन 106: ख्रिस्तामध्ये विसावणे

दर रात्री झोपायला जाताना आपल्या प्रभूच्या कृपेत आणि दयेत विसावण्याचे आमंत्रण तुम्हाला मिळते. नवे बळ मिळावे आणि तुम्ही ताजेतवाने व्हावे म्हणून त्याच्या कुशीत विसावण्याचे आमंत्रण तो तुम्हाला देतो. झोप ही प्रार्थनेसारखी आहे; किंबहुना ती प्रार्थनेचे एक रूपही होऊ शकते. विश्रांती घेणे म्हणजे देवामध्ये विसावा घेणे. प्रत्येक…

चिंतन 105: आपल्या अंतरी देवाच्या वासाचे परिणाम

देवाने तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात पूर्णपणे वास केला, तर तुम्हाला काय अनुभव येईल? शांती, आनंद आणि विस्मय! या देणग्यांमुळे आणि तुमच्या अंतरी असलेल्या पवित्र त्रैक्याच्या वासामुळे तुम्हाला संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, भीती दूर सारण्याचे बळ आणि अभेद्य संरक्षण मिळेल…