मराठी

चिंतन 24: आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण

देवाच्या भेटीसाठी आत्मा तळमळतो, तेव्हा होणारी वेदना ही आपण सहन करू शकणारी सर्वांत मोठी वेदना आहे. शुद्धीस्थानातील आत्म्यांना फार दुःख होते, कारण त्यांना देवाची ओढ आहे, पण देव अजून पूर्णपणे त्यांचा झालेला नाही. आपणही इथेच आणि आत्ताच या शुद्धीकरणाला सामोरे गेले पाहिजे. आपण आपल्या मनात देवाची ओढ जागी होऊ दिली पाहिजे. आपण…

चिंतन 23: जेव्हा देव मौन आहे असे वाटते

आपल्या दयाळू प्रभूला अधिकाधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा कधीकधी तो मौन आहे असे वाटते.  कदाचित पाप आड आले असेल, किंवा देवाविषयीच्या तुमच्या स्वतःच्या कल्पनेमुळे त्याचा खरा स्वर तुम्हाला ऐकू येत नसेल आणि त्याची खरी उपस्थिती तुम्हाला जाणवत नसेल.  इतर वेळी येशू आपली उपस्थिती लपवतो…

चिंतन 22: तुमच्या आत्म्याची ग्रहणक्षमता वाढवणारी विपुल दया

तुमच्या आत्म्यात येशूची भेट झाली की, त्याच्या आणखी जवळ जाण्याची ओढ तुमच्यात निर्माण होते. तुम्हाला येशूच्या आणखी जवळ जावेसे वाटते का? तुम्हाला त्याच्या दयेची आस आहे का? त्याची ओढ, त्याच्या अधिक जवळ जाण्याची आस, आपले अंतःकरण विशाल करते आणि दररोज त्याची अधिक दया स्वीकारण्यास आपल्याला समर्थ बनवते. ही ओढ…

चिंतन 21: तुमच्यावर प्रेम आहे.  हे खरे आहे, असा विश्वास ठेवा.

ख्रिस्ताने तुमचा स्वीकार केला आहे. त्याच्या दयाळू हृदयात राहिल्याने तो तुमच्यावर किती प्रेम करतो, हे तुम्हाला उमगेल.  तुमच्या कल्पनेपलीकडे तो खरोखरच तुमच्यावर प्रेम करतो.  ते प्रेम हळूहळू स्वतः अनुभवू लागा.  त्या प्रेमाचा आस्वाद घ्या, ते खरे आहे यावर विश्वास ठेवा, ते समजून घ्या आणि अधिक उत्कटतेने त्याचा शोध घ्या…

चिंतन 20: दररोज आपले जीवन येशूला अर्पण करा

येशूने तुमचा स्वीकार करून तुमच्या आत्म्याचा ताबा घेतल्यावर, पुढे काय होईल याची चिंता करू नका. तुमच्या जीवनात लगेच मोठा बदल घडेल अशी अपेक्षा करू नका; पण तसा बदल घडला तर आश्चर्यचकितही होऊ नका. महत्त्वाचे एवढेच की दररोज नव्याने तुम्ही स्वतःला अर्पण करावे, त्याच्या…

चिंतन 19: प्रभू आपल्या दयेतून तुमचा स्वीकार करतो

जर तुम्ही खरोखरच आपल्या दैवी प्रभूचा शोध घेतला असेल, तर तो तुम्हाला आपल्या हृदयात आणि आपल्या पवित्र इच्छेत सामावून घेईल का, हे त्याला विचारा.  त्याला विचारा आणि त्याचे उत्तर ऐका.  जर तुम्ही सर्व काही त्याच्या हाती सोपवून स्वतःला त्याला अर्पण केले असेल, तर तो तुमचा स्वीकार करतो, असे तुम्हाला सांगेल.  एकदा…

चिंतन १८: याजकांद्वारे लाभणारी दया

देवाची दया अनेक मार्गांनी लाभते. ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत; देवाच्या पवित्र याजकांद्वारे ती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या याजकाला तुमचे म्हणणे ऐकू द्या, तुमच्याशी बोलू द्या आणि तुम्हाला मार्गदर्शन करू द्या. याजकही दुर्बल आहेत आणि तेही पापी आहेत. पण त्यांच्या दुर्बलतेतही आत्म्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना विशेष कृपा दिली जाते. …

चिंतन 17: प्रार्थनेत आपल्या धन्य मातेकडे वळा 

पूर्ण भरवशाने प्रार्थना करत आपल्या धन्य मातेकडे वळा. ती तुम्हाला आपल्या निष्कलंक हृदयाशी धरते आणि आपला पुत्र येशू याच्याकडे नेईल. ती आदर्श माता आहे, सर्व कृपांची माता आहे. तिच्या मायेच्या काळजीवर आणि मध्यस्थीवर भरवसा ठेवा. कृपेचे भांडार कसे उघडावे, हे तिला माहीत आहे…

चिंतन १६: देवाच्या हाती स्वतःला पूर्णपणे सोपवणे

देवासमोर नतमस्तक व्हा. त्याच्यासमोर साष्टांग दंडवत घाला. शक्य असेल तर प्रत्यक्ष तसे करा. त्यामुळे इतरांचे लक्ष विचलित होणार असेल, तर मनोमन तसे करा. देवासमोर साष्टांग दंडवत घालून त्याला कळकळीने विनवा की त्याने तुम्हाला आपली दैवी दया आणि आपली परमपवित्र इच्छा प्रकट करावी. असे अनेक प्रसंग येतात…

चिंतन 15: देवाचे प्रेम कधीच थांबत नाही

तुम्ही देवाच्या हाकेला ‘नंतर’ म्हणता का? तो सतत हाक देतो, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता का? लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य गोष्टींमध्ये तुम्ही त्याचा आवाज दडपून टाकता का? लक्षात ठेवा, देव तुम्हाला हाक देणे कधीच थांबवत नाही. त्याचे ऐका. कधीकधी आपण देवाच्या हाकेला ‘नंतर’ म्हणतो, कारण दुसऱ्या एखाद्या मार्गाने जीवनात समाधान मिळेल, असे आपल्याला चुकीने वाटते…