मराठी

चिंतन 80: आपल्या मृत्यूच्या घटकेला

तुम्ही ‘नमो मरिये’ ही प्रार्थना म्हटली असेल, तर या जगातील तुमच्या शेवटच्या घटकेसाठीही तुम्ही प्रार्थना केली आहे: “आता आणि आमच्या मृत्यूच्या घटकेला आमच्यासाठी प्रार्थना कर.”  अनेकांना मृत्यूची भीती वाटते, आणि आपल्या मृत्यूच्या घटकेचा विचार करावासा सहसा आपल्याला वाटत नाही.  पण…

चिंतन ७९: आपली धन्य दुःखमाता

मरिया मातेने आयुष्यात खूप काही सोसले. तिच्या तारणाऱ्याचा गर्भ तिच्या उदरी चमत्कारिक रीतीने राहिला, तेव्हा तिला लोकांचा संशय आणि उपहास सहन करावा लागला. लोकांनी तिच्या दैवी पुत्राला नाकारले आणि त्याच्याविषयी गैरसमज करून घेतले, तेव्हा ती हे सारे आईच्या परिपूर्ण प्रेमाने पाहत होती. त्याच्या मरणयातनेत आणि मृत्यूच्या वेळीही ती त्याच्या पाठीशी उभी राहिली. आणि या साऱ्या अनुभवांतून…

चिंतन 75: इतरांमध्ये ख्रिस्ताची भेट

पवित्र परमप्रसाद खरोखरच पवित्र आहे. आपण त्याची भक्तिभावाने आराधना करतो आणि तो अत्यंत आदराने हाताळतो. आपण आपल्या प्रभूला कधीही फेकून देणार नाही, जमिनीवर टाकणार नाही किंवा त्याचा अनादर होईल अशा कोणत्याही ठिकाणी टाकून देणार नाही. तरीही, आपण येशूला दाखवतो तितक्याच आदराने इतरांशी वागण्यात अनेकदा कमी पडतो…

चिंतन 74: करुणामय हृदय

‘सहानुभूती’ आणि ‘करुणा’ यांत काही फरक आहे का? असेल तर तो काय? आणि यांपैकी कोणती अधिक इष्ट आहे? सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपल्याला वाईट वाटणे. एका अर्थी, आपल्याला त्या व्यक्तीची कीव येते. पण करुणा याहीपलीकडे जाते. तिचा अर्थ असा की आपण…

चिंतन 73: येशूविषयीची आपली ओढ वाढत जाणे

येशूची ओळख आपल्याला जितकी अधिक होते, तितकी त्याच्याविषयीची आपली ओढ वाढते. आणि त्याच्याविषयीची ओढ जितकी वाढते, तितकी त्याची ओळख अधिक सखोल होते. ओळखीतून ओढ वाढण्याचा आणि ओढीतून ओळख सखोल होण्याचा हा सुंदर अनुभव आहे (रोजनिशीतील परिच्छेद 273 पाहा)…

चिंतन 70: दुःख भोगणाऱ्या ख्रिस्ताशी एकरूप होणे

ख्रिस्ताचे कोणते रूप तुम्हाला अधिक जवळचे वाटते? कोणत्या रूपाशी तुम्ही अधिक सहजपणे एकरूप होऊ शकता? सर्वांचा राजा म्हणून गौरवलेला ख्रिस्त, की मारहाण सोसून दुःख भोगणारा ख्रिस्त? शेवटी, गौरव आणि वैभवाने प्रकट झालेल्या प्रभूवर आपली दृष्टी खिळून राहील आणि हाच…

चिंतन 68: इतरांच्या चांगुलपणात आनंद मानणे

इतरांनी काही चांगले केले, तर तुमची प्रतिक्रिया काय असते? एखाद्या मुलाने काही चांगले केले, तर बहुधा तुम्हाला मनापासून आनंद होतो. पण इतरांच्या बाबतीत काय? इतरांच्या चांगल्या कृतींत मनापासून आनंद मानता येणे, ही दयाळू हृदयाची खात्रीची खूण आहे. हे करताना हेवा आणि मत्सर अनेकदा आड येतात…

चिंतन 67: प्रेमाची गुप्त गुलाबफुले

प्रेमाच्या काही कृती एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांपुरत्याच असतात. अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि स्वतःला अर्पण करण्याच्या कृती म्हणजे त्या दोघांच्या नात्यात गुप्तपणे दिल्या-घेतल्या जाणाऱ्या प्रेमाच्या अनमोल भेटी. देवावरच्या आपल्या प्रेमालाही हे लागू होते. आपले अतिशय खोल प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग आपण नियमितपणे शोधले पाहिजेत…

चिंतन 66: दयेद्वारे न्याय

काही जणांना दिवसेंदिवस दुसऱ्या व्यक्तीच्या कठोर आणि क्रूर वागणुकीला सामोरे जावे लागते. हे फार वेदनादायक असते. त्यामुळे, दुःख देणाऱ्या व्यक्तीला तिच्या कृत्यांचा जाब विचारला जावा आणि न्याय मिळावा, अशी तीव्र इच्छा होऊ शकते. पण खरा प्रश्न असा आहे: प्रभू मला काय करायला बोलावत आहे? मी कसा प्रतिसाद देऊ…

चिंतन ६१: आनंद कुठून मिळतो?

तुरुंगात असतानाही तुम्ही आनंदी राहू शकाल का? किंवा अगदी तरुण वयात एकांतवासी मठात प्रवेश करून आयुष्यभर एकांतात राहण्याचे तुम्हाला पाचारण मिळाले तर? अत्यंत गरिबीत, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यापुरतेही जेमतेम मिळत असताना तुम्हाला आनंद लाभू शकेल का…